ऑनलाईन लोकमतयवतमाळ : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तिथीनुसार साजऱ्या होणाऱ्या जयंती निमित्त शिवजयंती उत्सव समितीद्वारा रविवार ४ मार्च रोजी शिवछत्रपती दौड स्पर्धा घेण्यात आली. मुलांच्या पाच किलोमीटर धावण्याच्या गटात येथील लोकनायक बापूजी अणे विद्यालयाचा विद्यार्थी अजिंक्य गायकवाड व मुलींच्या तीन किलोमीटर गटात रिना मेश्राम यांनी अव्वल स्थान पटकाविले.यवतमाळ जिल्हा अॅथलेटिक्स संघटना, क्रीडा भारती, श्री शिवाजी मंडळ, शारीरिक शिक्षक संघटना यांच्यावतीने ही स्पर्धा घेण्यात आली. यात १०० ते १२० स्पर्धक सहभागी झाले होते. माळीपुरा येथील शिवाजी चौकातून स्पर्धेला प्रारंभ झाला. शिवसेना जिल्हा प्रमुख राजेंद्र गायकवाड, पराग पिंगळे, स्पर्धा संयोजक प्रा.अनंत पांडे, नगरसेविका रेखा कोठेकर, अजय म्हैसाळकर आदींच्या प्रमुख उपस्थितीत दौड स्पर्धेला सुरुवात करण्यात आली.मुलांच्या पाच किलोमीटर गटातील निकाल याप्रमाणे. प्रथम अजिंक्य गायकवाड, द्वितीय अभिषेक नाचपेलवार, तृतीय सुरज कोमपेलवार, चतुर्थ हर्ष येंडे, पाचवा उज्ज्वल कहाते, सहावा निखिलेश बुटले, प्रोत्साहन अर्जून गावंडे. तीन किलोमीटर मुली- प्रथम रिना मेश्राम, द्वितीय अवंतिका वासनिक, तृतीय गुंजन खिची, चतुर्थ साक्षी राऊत, पाचवा संजना ढोके, सहावा इशा लढे, प्रोत्साहन वंशिका खडसे, गायत्री चांदूरकर, साक्षी मेश्राम. बक्षीस वितरण कार्यक्रमाला यवतमाळ अर्बन बँकेचे अध्यक्ष अजय मुंधडा, अशोक जिरकर, अजय म्हैसाळकर, गणेश बयस, नितीन पखाले, डॉ. उल्हास नंदुरकर, मनोज येंडे, जिल्हा शिवसेना प्रमुख राजेंद्र गायकवाड, संतोष ढवळे, सतपाल सोवळे आदी उपस्थित होते. संचालन प्रा.अनंत पांडे यांनी तर प्रास्ताविक विवेक कवठेकर यांनी केले. पंच म्हणून अविनाश जोशी, प्रा. प्रेमेंद्र रामपूरकर, अजय मिरकुटे, संजय बट्टावार, पीयूष भुरचंडी, एम.एन. मीर, श्रीकांत राऊत, जितेंद्र सातपुते, प्रितम शहाडे, अक्षय शहाडे, अमित गुरव, व्ही.एस. रंगारी, सचिन भेंडे यांनी काम पाहिले.
दौड स्पर्धेत अजिंक्य, रिना अव्वल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2018 22:02 IST
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तिथीनुसार साजऱ्या होणाऱ्या जयंती निमित्त शिवजयंती उत्सव समितीद्वारा रविवार ४ मार्च रोजी शिवछत्रपती दौड स्पर्धा घेण्यात आली.
दौड स्पर्धेत अजिंक्य, रिना अव्वल
ठळक मुद्देशिवजयंती उत्सव : शंभरावर स्पर्धकांचा सहभाग