शहरं
Join us  
Trending Stories
1
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
2
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
3
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
4
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
5
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
6
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 
7
हेल्थ-लाईफ इन्शुरन्स, दैनंदिन वापराच्या गोष्टी होणार स्वस्त; या गोष्टी महागणार, दिवाळीनंतर GST मध्ये मोठा बदल
8
४ तासांची भेट, एकाच खोलीतून ७००० अणुबॉम्बवर नियंत्रण; पुतिन-ट्रम्प भेटीत हायटेक सुरक्षा
9
'जरा... जरा मराठी'! गोड 'कॅडबरी'च्या तोंडी मराठीचे 'धडे'; तुम्हीही म्हणाल, खूपच भारी 
10
Agni-6 Missile : मोठी तयारी! अग्नि-६ क्षेपणास्त्र किती धोकादायक? भारत चाचणी करू शकतो, २ दिवसांचा नोटम जारी
11
पालघर: मालवाहू जहाजाची मासेमारी करणाऱ्या बोटीला धडक, चार मच्छिमार पडले समुद्रात; 15 मच्छिमारांना कुणी आणले किनाऱ्यावर?
12
बुलढाणा: जलसमाधी आंदोलन करायला गेले अन् आंदोलकच गेला वाहून; अधिकाऱ्यांसोबत कशावरून झाली बाचाबाची?
13
कोट्यवधीची रोकड, ६.७ किलो सोनं आणि..., काँग्रेसच्या आमदाराकडे सापडलं घबाड, EDची कारवाई   
14
हुमायूं मकबऱ्यात भिंत कोसळली, ७-८ जण दबले; मदत कार्य सुरू; व्हिडीओ आला समोर
15
'अमरीका ने कुत्ते पाले, वर्दी वाले-वर्दी वाले', पीओके मध्ये पाकिस्तान लष्कर प्रमुखांविरोधात घोषणा; व्हिडीओ व्हायरल
16
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
17
डोनाल्ड ट्रम्प भेटीपूर्वी व्लादिमीर पुतिन यांचा झटका; ४१५ कोटींचं लढाऊ विमान 'गायब'? 
18
ज्या चित्रपट निर्मात्याला राखी बांधली, पुढे त्याचीच पत्नी बनली ही अभिनेत्री, लग्नापूर्वीच...    
19
"भटक्या कुत्र्यांना शेल्टर होममध्ये ठेवल्याने प्रश्न सुटणार नाही, तर..."; सरसंघचालक भागवतांनी काय सुचवला पर्याय?
20
VIDEO: जय महाकाल !! आशिया कपआधी गौतम गंभीर सहकुटुंब महाकालेश्वराच्या चरणी, भस्म आरतीही केली!

कैद्यांच्या तुरुंग कहाण्यांचा थरार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2018 21:39 IST

शिक्षा भोगून कारागृहाबाहेर आलेल्या कैद्यांचे उर्वरित आयुष्य कसे असते, याचा अंगावर शहारे आणणारा थरार त्यांच्याच तोंडून बाहेर पडला. एकदा कारागृहाचा शिक्का लागला की कुटुंब उद्ध्वस्त होते, रक्ताचे नातेवाईक, शेजारी व समाजही दुरावतो.

ठळक मुद्देकुटुंब उद्ध्वस्त : समाज-नातेवाईकांचा दुरावा, लग्न-समारंभ, कामालाही बोलवेना

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शिक्षा भोगून कारागृहाबाहेर आलेल्या कैद्यांचे उर्वरित आयुष्य कसे असते, याचा अंगावर शहारे आणणारा थरार त्यांच्याच तोंडून बाहेर पडला. एकदा कारागृहाचा शिक्का लागला की कुटुंब उद्ध्वस्त होते, रक्ताचे नातेवाईक, शेजारी व समाजही दुरावतो. लग्न समारंभात टाळले जाते, एवढेच काय गावात कुणी कामालाही बोलावत नाही, अशी व्यथा कैद्यांनी बोलून दाखविली.कैदी व न्यायाधीन बंद्यांच्या हक्कासाठी लढणाऱ्या ‘वऱ्हाड’ या स्वयंसेवी संस्थेने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची कर्मभूमी असलेल्या गुरुकुंज-मोझरी (जि. अमरावती) येथे किलबिल सेंटरमध्ये ‘तुरुंग कहाण्या : बंदीवास ते पुनर्वसन’ हा कार्यक्रम घेतला. २९, ३० व ३१ डिसेंबर असे तीन दिवस हा कार्यक्रम झाला. विदर्भाच्या यवतमाळसह ११ जिल्ह्यातील सुमारे १०० कैदी-न्यायाधीन बंद्यांची या कार्यक्रमाला उपस्थिती होती. त्यात तब्बल ४० महिलांचा समावेश होता. उपस्थितांपैकी बहुतांश खुनाच्या गुन्ह्यातील होते.कुणी २० वर्षे तर कुणी १० वर्षे शिक्षा भोगलेले, सत्र न्यायालयाने शिक्षा दिली, परंतु उच्च न्यायालयात निर्दोष सुटलेल्यांचा त्यात समावेश होता. या निवासी कार्यक्रमाला बाहेरुन कोणत्याही वक्त्याला बोलाविण्यात आले नव्हते. तर उपस्थित कैदीच एकमेकांचे नातेवाईक, मित्र व वक्ते झाले होते. त्यांनी आपले थरारक अनुभव या कार्यक्रमात कथन केले. यावेळी त्यांनी कारागृहात चालणारे धक्कादायक प्रकारही उघड केले.पॅरोल-फर्लो रजा महागलीपॅरोल-फर्लो रजा पूर्वी १०० रुपयांच्या बाँडवर जामीन देऊन मिळत होती. मात्र शासनाने आता हे नियम कडक केले असून २० ते २५ हजार रुपयांचा जामीन मागितला जातोय. आधीच सर्व उद्ध्वस्त झालेल्यांनी २५ हजार आणायचे कोठून, असा प्रश्न उपस्थित केला गेला.जिवंतपणीच मृत्यूच्या यातनाकारागृहातली शिक्षा तुलनेने सुसह्य असते. पण कारागृहातून बाहेर आल्यावर भोगावा लागणारा सामाजिक बहिष्कार जिवंतपणीच मृत्यूच्या यातना देत असतो. हाच थरारक, विदारक अनुभव कैद्यांनी बोलून दाखविला. यावेळी बहुतेकांनी आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली. या कैद्यांच्या सुटकेसाठी ‘वऱ्हाड’ने प्रयत्न केले, हे विशेष!यवतमाळच्या कैद्याने गमावले वर्षभरात कुटुंबातील दोन जीव, धक्क्याने झाले मृत्यूयवतमाळच्या एका कैद्याने सांगितले की, मी कारागृहात गेलो याचा धक्का कुटुंबाला सहन करता आला नाही. त्यामुळे दीड वर्षातच कोणताही आजार नसलेल्या पत्नी व पाठोपाठ मुलाचे निधन झाले.अकोल्यातील महिलेने सांगितले की, तिचा पती कारागृहात आहे. तो सुटावा म्हणून घरदार विकून फी दिली. मात्र सुटका झाली नाही. आता उच्च न्यायालयात जाण्याची आर्थिक कुवत नाही. लहान मुलगा आहे, त्यामुळे रहावे कुठे, जगावे कसे, हा प्रश्न आहे. जागा नसल्याने घरकूलही मिळू शकत नाही.बुलडाण्यातील महिलेने सांगितले की, कौटुंबिक प्रकरणात आम्ही दोघी कारागृहात होतो. आम्ही जामिनावर आलो, परंतु आमच्या कुटुंबातील चौघेही पुरुष कारागृहात आहेत. सासू व दोन जाऊ एवढ्या तीन महिलाच बाहेर आहेत. पुरुषांना सोडवावे कसे, याचा प्रश्न उभा आहे.एका कैद्याने सांगितले की, मी १९ वर्षे जन्मठेप भोगली. परंतु मी निर्दोष आहे, पाहिजे तर गावकऱ्यांना विचारा. एका मृत्यूपूर्व बयानाच्या आधारे मला शिक्षा झाली आणि माझे आयुष्यच उद्ध्वस्त झाले.एक कैदी म्हणाला, कारागृहातून बाहेर पडल्यावर खुनाचा अनुभव आहे म्हणून थेट खूनाच्याच सुपाऱ्यांची आॅफर येऊ लागली. एकवेळ हातून खून करण्याची चूक झाली. म्हणून पुन्हा-पुन्हा खून करणार काय? असे ठणकावत ही आॅफर धुडकावली.एका कैद्याने सांगितले की, गुन्हा घडला, शिक्षा झाली, प्रायश्चित्त घेतले. पण आता पुन्हा कधीही त्या वाटेने जाणे नाही.