यवतमाळ : शासकीय योजनांची माहिती ग्रामीण भागात पोहोचविण्यासाठी जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने फिरत्या चलचित्र जनजागृती रथाचा उपक्रम राबविण्यात येत आहे. या रथाचा प्रारंभ पालकमंत्री संजय राठोड यांच्याहस्ते बचत भवन, दारव्हा येथे करण्यात आला.यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी, उपविभागीय अधिकारी चेतन गिरासे, जिल्हा माहिती अधिकारी मंगेश वरकड, दारव्हाचे तहसीलदार राऊत उपस्थित होते. या फिरत्या जनजागृती रथावर जलयुक्त शिवार अभियान, जनधन योजना, बळीराजा चेतना अभियान, जिल्ह्याकरिता राबविण्यात असलेल्या विशेष मदतीचा कार्यक्रम यासारख्या कल्याणकारी योजना रेखाटण्यात आल्या आहे. सोबतच एलईडी प्रोजेक्टरद्वारे विविध योजनांची माहिती सचित्र दाखविण्यात येत आहे. (स्थानिक प्रतिनिधी)
फिरत्या चलचित्र जनजागृती रथाचा दारव्ह्यात प्रारंभ
By admin | Updated: January 11, 2016 02:17 IST