शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

संघर्षाची व संवादाची यात्रा ही आमची परंपरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2019 21:54 IST

पाच वर्ष शासक नव्हे तर सेवक म्हणून काम केले. त्यामुळे आम्हाला पुन्हा एकदा जनादेश हवा आहे. जनतेच्या आशीर्वादाने विधानसभेवर पुन्हा भाजप-सेनेचा झेंडा फडकवू असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

ठळक मुद्देमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : दारव्हा येथील सभेत मांडला कामाचा लेखाजोखा, महाजनादेश यात्रेचे स्वागत

लोकमत न्यूज नेटवर्कदारव्हा : पाच वर्ष शासक नव्हे तर सेवक म्हणून काम केले. त्यामुळे आम्हाला पुन्हा एकदा जनादेश हवा आहे. जनतेच्या आशीर्वादाने विधानसभेवर पुन्हा भाजप-सेनेचा झेंडा फडकवू असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.दारव्हा येथील शिवाजी स्टेडियमवर मंगळवारी झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा तालुक्यात दाखल झाल्यानंतर बोरी आणि बोदेगाव येथे स्वागत झाले. सभेला आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके, कामगार मंत्री डॉ. संजय कुंटे, पालकमंत्री मदन येरावार, महसूल राज्यमंत्री संजय राठोड, गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील, सफाई कामगार आयोगाचे अध्यक्ष रामूजी पवार, आमदार प्रवीण पोटे, आमदार संजीवरेड्डी बोदकूरवार, आमदार राजू तोडसाम, आमदार राजेंद्र नजरधने, आमदार अ‍ॅड. नीलय नाईक, माजी राज्यमंत्री संजय देशमुख, भाजप जिल्हाध्यक्ष राजेंद्र डांगे उपस्थित होते.विरोधक महाजनादेश यात्रेवर टीका करीत असले तरी यात्रा ही भाजपची परंपरा आहे. विरोधात असताना संघर्षाची आणि सत्तेत संवादाची यात्रा काढत आहोत, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले. यापूर्वीच्या सत्ताधाऱ्यांनी यवतमाळ जिल्ह्याच्या तोंडाला पाने पुसली. आम्ही मात्र ११ कोटींची कर्जमाफी दिली, १९२ कोटी पीक विमा आणि पाच हजार ७०० कोटींचे पीक कर्ज वाटप केले. यवतमाळ-वर्धा-नांदेड रेल्वे मार्गासाठी ९७ टक्के भूसंपादनाचे काम पूर्ण झाले. वर्षभरात या मार्गाचा एक टप्पा सुरू करू असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.तत्पूर्वी आमदार प्रवीण पोटे, माजी राज्यमंत्री संजय देशमुख, महादेवराव सुपारे, डॉ. अजय दुबे यांनी विचार व्यक्त केले. भाजपचे तालुकाध्यक्ष दत्तात्रय राहणे यांनी आभार मानले. मंचावर भाजप-शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.आगामी मुख्यमंत्रीही फडणवीसच -संजय राठोडमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जाहीर सभेला शिवसेनेचे महसूल राज्यमंत्री संजय राठोड आवर्जुन उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांचे मंचावर आगमन झाल्यानंतर एकमेव ना. संजय राठोड यांचेच मुख्यमंत्र्यांव्यतिरिक्त भाषण झाले. त्यांच्या भाषणालाही उपस्थितांनी टाळ्या वाजवून दाद दिली. राज्याचा पुढचा मुख्यमंत्रीही देवेंद्र फडणवीस होतील यात मला शंका वाटत नाही, अशा शब्दात ना. संजय राठोड यांनी विश्वास व्यक्त केला. पाच वर्षात मुख्यमंत्र्यांची समर्थपणे साथ मिळाली, त्यामुळे महसूल विभागात अनेक निर्णय घेता आले. मुख्यमंत्र्यांनी चांगल्या पद्धतीने अनेक प्रश्नांची सोडवणूक केल्याचेही ते म्हणाले.

टॅग्स :Maha Janadesh Yatraमहाजनादेश यात्राDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस