शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

उमरखेड येथे पत्रकारांचा मूक मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2018 23:29 IST

पत्रकारावर हल्ला करून उलट त्याच्यावरच खंडणीचा गुन्हा दाखल करणाऱ्या वनरक्षक व दोषी पोलीस अधिकाऱ्यावर तत्काळ कारवाई करावी, या मागणीसाठी उमरखेड येथील पत्रकारांनी....

ठळक मुद्देएसडीओंना निवेदन : दोषी अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कउमरखेड : पत्रकारावर हल्ला करून उलट त्याच्यावरच खंडणीचा गुन्हा दाखल करणाऱ्या वनरक्षक व दोषी पोलीस अधिकाऱ्यावर तत्काळ कारवाई करावी, या मागणीसाठी उमरखेड येथील पत्रकारांनी मंगळवारी येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा काढला. एसडीओंना निवेदन देण्यात आले.उमरखेड येथील वनपाल पेटेकर यांनी पत्रकार देवानंद पुजारी यांना त्यांच्या कार्यालयात बोलाविले. त्या ठिकाणी वनरक्षक भोरगे यांनी पुजारी यांना शिवीगाळ करून मारहाण केली. त्यानंतर या प्रकरणी उमरखेड ठाण्यात खंडणी मागितल्याची तक्रार दिली. पोलिसांनीही कोणतीही शहनिशा न करता तडकाफडकी खंडणीचा खोटा गुन्हा दाखल केला. पत्रकारांना हा वेठीस धरण्याचा प्रकार असून या विरोधात मंगळवारी मूक मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात दैनिक वृत्तपत्र, वार्ताहर संघ, तालुका पत्रकार संघ, साप्ताहिक पत्रकार संघ, इलेक्ट्रॉनिक्स मीडिया ग्रुप यांच्यासह ढाणकी, मुळावा, महागाव, पोफाळी, बिजोरा, मोहदी, मुडाणा येथील पत्रकार सहभागी झाले होते. स्थानिक गांधी चौकातून काळ्याफिती लावून हा मोर्चा काढण्यात आला. मोर्चेकºयांनी निवेदन उपविभागीय अधिकारी स्वप्नील कापडनीस, तहसीलदार भगवान कांबळे यांना दिले. तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पुज्जलवार व ठाणेदार हनुमंत गायकवाड यांनाही निवेदन दिले. दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस १२ एप्रिल रोजी उमरखेड येथे येत असून या प्रकरणी पत्रकारांचे शिस्टमंडळ त्यांना भेटणार आहे.