शहरं
Join us  
Trending Stories
1
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
2
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
3
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
4
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
5
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
6
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
7
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
8
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
9
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
10
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
11
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
12
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
13
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
14
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
15
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)
16
"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन
17
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर
18
'निराधार आणि बेजबाबदार'; राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाने सोडले मौन, काय दिले उत्तर?
19
IND vs ENG 5th Test: Gus Atkinson चा 'पंजा'! टीम इंडियानं २० धावांत गमावल्या ४ विकेट्स! अन्...
20
सेबीच्या नियमांना फाटा देऊन शेअर्सची खरेदी-विक्री, पण धोकाही मोठा! 'ग्रे मार्केट'ची Inside Story

‘जेडीआयईटी’त राष्ट्रीय परिषद ‘स्फिलाटा-१७’ उत्साहात

By admin | Updated: March 11, 2017 00:58 IST

येथील जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयात राष्ट्रीय स्तरावरील परिषद ‘स्फिलाटा-१७’ उत्साहात पार पडली.

यवतमाळ : येथील जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयात राष्ट्रीय स्तरावरील परिषद ‘स्फिलाटा-१७’ उत्साहात पार पडली. उद्घाटनप्रसंगी मंचावर उपविभागीय पोलीस अधिकारी पीयूष जगताप, प्राचार्य उज्ज्वला मालवे, प्रा. भंडारे, प्राचार्य डॉ. अविनाश कोल्हटकर, प्रा. गणेश काकड, ‘स्फिलाटा-१७’चे समन्वयक प्रा. अजय राठोड, विद्यार्थी प्रतिनिधी सागर साळुंके, श्याम राठोड आदी होते. माँ सरस्वती व स्वातंत्र्य संग्राम सेनानी जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाला सुरूवात झाली. स्मरणिका ‘टेक्सोरा-१७’चे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी समयोचित विचार मांडले. टेक्सटाईल इंजिनिअरिंगच्या विविध विषयांवर गारमेंट डिझाईनिंग, अ‍ॅसेसरिज डिझाईनिंग, रिअल मॉडेल ड्रेपिंग, फॅशन स्केचिंग अँड इल्युस्ट्रेशन, पेपर व पोस्टर प्रेझेंटेशन स्पर्धेत देशभरातील विविध महाविद्यालयांच्या स्पर्धकांनी सहभाग नोंदविला. स्वत: डिझाईनिंग केलेले आणि स्पर्धेसाठी खास बनविलेल्या पोषाखात विद्यार्थी सहभागी झाले होते. जळगावच्या डॉ. वर्षा पाटील महाविद्यालयाची सायली कोली या दिव्यांग विद्यार्थिनीने फॅशन स्केचिंग अँड इल्युस्ट्रेशन स्पर्धेत सहभाग नोंदविला. प्रा. स्वप्ना जवादे, प्रा. रेणुका मुळे, प्रा. शीतल वनकर, प्रा. सुरज पाटील, मीनल जयस्वाल, प्रा. राम सावंत, प्रा. शीतल वनकर यांनी परीक्षक म्हणून काम सांभाळले. गारमेंट्स मॅन्युफॅक्चरिंगमध्ये शिवाजी कॉलेज अकोलाचे ज्ञानेश्वर गावंडे, राजकुमार जिवतानी यांनी प्रथम क्रमांक पटकाविला. कोल्हापूरचे रितु चौधरी, श्रेयश देसाई यांनी द्वितीय, लातूरच्या महिला तंत्रनिकेतनची अश्विनी गौड हिने तृतीय बक्षीस पटकाविले. औरंगाबादच्या अमृता आंबेकर, प्रियंका थेटे यांना प्रोत्साहनपर बक्षीस देण्यात आले. अ‍ॅसेसरिज डिझाईनिंगमध्ये येथील महिला तंत्रनिकेतनच्या उम्मे सलमा बोहरा व श्वेता हातगावकर यांनी प्रथम, कोल्हपूरच्या निधी जैन हिने द्वितीय क्रमांक प्राप्त केला. पेपर प्रेझेंटेशनमध्ये सुशांत सावंत (मुंबई), व्यंकटबाबू विग्नन (गुंटूर, आंध्रप्रदेश), बरखा शेंडे (वर्धा) यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय, तर इचलकरंजीचा शिधेस यादव प्रोत्साहनपर बक्षिसाचा मानकरी ठरला. पोस्टर प्रेझेंटेशनमध्ये अमित देसाई कुलदीप चव्हाण (इचलकरंजी) प्रथम, रोहितकुमार गिरासे, राहुल गिरासे (शिरपूर, धुळे) यांना द्वितीय बक्षीस प्राप्त झाले. रिअल मॉडेल ड्रेपिंगमध्ये प्रथम साक्षी यादव व प्रांजली कवाडे (यवतमाळ), द्वितीय क्रमांक खुशबू जैन, निधी अंजीकर, श्रेया बागडे (यवतमाळ) यांना मिळाला. फॅशन स्केचिंग अँड इल्युस्ट्रेशनमध्ये कुलदीप चव्हाण (इचलकरंजी) प्रथम, आकाश कामडे (जेडीआयईटी यवतमाळ) द्वितीय आला. सायली कोली हिला उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले. बक्षीस वितरण प्राचार्य डॉ. अविनाश कोल्हटकर व टेक्सटाईल इंजिनिअरिंग विभाग प्रमुख प्रा. गणेश काकड यांच्या हस्ते झाले. संचालन अंकित डेरे यांनी तर, प्रा. अजय राठोड यांनी आभार मानले. या स्पर्धेचे प्रमुख प्रायोजक मॅग सॉल्विस कोर्इंबतूर, एटीई एंटरप्रायजेस मुंबई, केतन हुंडाई, क्लब फॉक्स, कॉलेज कट्टा, शो आॅफ, रेडिअँट अकॅडमी, बॉडीलाईन लेडीज फिटनेस सेंटर, नाईस, फॅशन टेम्पल यवतमाळ हे आहेत. आयोजनाबद्दल अध्यक्ष देवेंद्र दर्डा यांनी कौतुक केले. स्पर्धेसाठी संस्थेचे सचिव किशोर दर्डा यांचे मार्गदर्शन लाभले. (वार्ताहर)