शहरं
Join us  
Trending Stories
1
हनिमूनसाठी नाही तर कायमचे संपवायला घेऊन गेली होती सोनम; पतीच्या हत्येप्रकरणी अखेर अटक
2
"भ्रष्टाचार संपवायचा असेल, तर 500 रुपयांची नोट बंद केली पाहिजे"; मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांचे विधान चर्चेत
3
मान्सून एक्स्प्रेसला ‘बॅड पॅच’; १३ जूनपासून पुन्हा धो-धो..., शेतकरी सक्रिय मोसमी पावसाच्या प्रतीक्षेत
4
"मंदिरापासून ते स्मशानभूमीपर्यंत सगळ्यांना समान अधिकार हवा"; सरसंघचालक मोहन भागवत यांचे विधान
5
"या प्रकरणानंतर मला काम मिळणं बंद होईल.."; 'पारु' मालिकेतील अभिनेत्याच्या व्हिडीओची चर्चा, काय म्हणाला?
6
"PM मोदी युद्ध थांबवण्यात यशस्वी, जर ते लांबले असतं तर नुकसान झालं असतं"; चंद्राबाबू नायडूंनी केलं कौतुक
7
आजचे राशीभविष्य : ०९ जून २०२५; आजचा दिवस व्यावसायिकांसाठी लाभदायी, नोकरीत बढती संभवते
8
...तर गुप्ता, सुपेकरांची चौकशी होणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
अमेरिकेतील हॉलीवूडचे शहर पेटले; पोलिसांवर फेकले दगड अन् फटाके, अवैध प्रवाशांविरुद्धच्या मोहिमेला प्रचंड विरोध
10
मोबाइल, लॅपटॉपमधून येणाऱ्या प्रकाशामुळेही तुम्हाला होऊ शकतो कॅन्सर; डॉक्टर म्हणतात, मोबाइल पाहणे थांबवाच
11
लाचखोर उपजिल्हाधिकारी, डीवायएसपी, तहसीलदार यांना अभय कोणाचे?; ३६६ प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत
12
पारंपरिक पदवी अभ्यासक्रमांमध्ये ५० टक्के कौशल्याधारित शिक्षण, युजीसीकडून लवकरच मार्गदर्शक सूचना; विद्यार्थ्यांच्या रोजगार क्षमतेत होणार वाढ
13
यूपीपाठोपाठ दिल्लीत एन्काउंटरमध्ये वाढ, जूनच्या पहिल्या पाच दिवसांत पाच एन्काउंटर
14
नेपाळच्या ७ हजार लोकांना अमेरिका सोडावी लागणार, अमेरिकेने विशेष देशाचा दर्जा काढून घेतला
15
अंध वकिलाकडून सुप्रीम कोर्टात प्रथमच युक्तिवाद, भारतीय न्यायव्यवस्थेत ऐतिहासिक क्षण
16
जळक्या नोटा : न्या. वर्मांपुढे आता राजीनाम्याचाच पर्याय
17
मणिपूर पेटले, निदर्शकांनी अंगावर घेतले पेट्रोल ओतून
18
घातपात की आणखी काही? योगी आदित्यनाथांच्या दौऱ्यापूर्वी ५०० किलो स्फोटके सापडली; 20 किमीपर्यंत पेरली...
19
गोव्यात चाललेय काय? आरोग्य मंत्र्यांकडून सीएमओचे काल निलंबन, आज मुख्यमंत्र्यांनी केले रद्द
20
उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का! ज्याच्यासाठी लोकसभेला काँग्रेसला नडले, त्यानेच साथ सोडली; चंद्रहार पाटलांचा रामराम  

जिल्ह्यातील सराफा व्यवसाय ठप्प

By admin | Updated: February 11, 2016 02:52 IST

दोन लाखांवरील सोने खरेदीसाठी पॅन कार्डची सक्ती मागे घ्यावी या मागणीसाठी पुकारलेल्या देशव्यापी बंदमध्ये यवतमाळ जिल्ह्यातील सराफ व्यावसायिक सहभागी झाले होते.

देशव्यापी बंद : पॅन कार्ड सक्तीचे प्रकरण यवतमाळ : दोन लाखांवरील सोने खरेदीसाठी पॅन कार्डची सक्ती मागे घ्यावी या मागणीसाठी पुकारलेल्या देशव्यापी बंदमध्ये यवतमाळ जिल्ह्यातील सराफ व्यावसायिक सहभागी झाले होते. संपूर्ण जिल्ह्यातील सराफा व्यवहार बुधवारी ठप्प झाले होते. यामुळे सुमारे एक कोटी रुपयांची उलाढाल ठप्प झाली आहे.केंद्र सरकारने दोन लाखांपेक्षा अधिक किंमतीचे सोने खरेदी करण्यासाठी पॅनकार्ड बंधनकारक केले आहे. त्यामुळे सराफा व्यवसायावर त्याचा परिणाम होणार आहे. ही सक्ती मागे घ्यावी आणि दहा लाख रुपयांच्यावर सोने खरेदी करण्यासाठी पॅन कार्ड सक्ती करावी, अशी मागणी करीत सराफा व्यावसायिकांनी बुधवारी देशव्यापी संप पुकारला. यात यवतमाळ जिल्ह्यातील सराफा व्यावसायिक सहभागी झाले होते. यवतमाळ शहरातील सराफा लाईन आज दिवसभर बंद होती. तसेच वणी, पुसद, दारव्हा, दिग्रस, बाभूळगाव येथील सराफा व्यावसायिकही या बंदमध्ये सहभागी झाले होते. बाभूळगाव येथील सराफा व्यावसायिकांनी बंदमध्ये सहभागी होऊन तहसीलदारांना निवेदन दिले. या निवेदनावर नितीन तातेड, गोपाल वर्मा, सुधीर रोकडे, सुरेश वर्मा, जितेंद्र तातेड, सम्राट अली, सुरेंद्र बहाड, महेश वर्मा, दिनेश रोकडे यांच्यासह अनेकांच्या स्वाक्षऱ्या आहे. (शहर वार्ताहर)२५० दुकानांचा सहभागयवतमाळ जिल्ह्यातील सुमारे २५० सराफा व्यावसायिक बुधवारच्या देशव्यापी बंदमध्ये सहभागी झाले होते. सराफा व्यावसायिकांच्या मागण्यासंदर्भात वरिष्ठ स्तरावर अर्थमंत्र्यांशी बोलणी सुरू असल्याची माहिती सराफा असोसिएशनचे अध्यक्ष सारंग भालेराव यांनी दिली. सराफा बाजारात दिवसभर शुकशुकाट दिसत होता.