शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

‘जेडीआयईटी’चे विद्यार्थी नामांकित कंपनीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2018 23:14 IST

येथील जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या २६ विद्यार्थ्यांची इंदौर येथील ‘मेक माय हाऊस’ या नामांकित कंपनीत निवड झाली आहे.

ठळक मुद्देजवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या २६ विद्यार्थ्यांची इंदौर येथील ‘मेक माय हाऊस’ या नामांकित कंपनीत निवड

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : येथील जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या २६ विद्यार्थ्यांची इंदौर येथील ‘मेक माय हाऊस’ या नामांकित कंपनीत निवड झाली आहे. आर्किटेक्चरल व इंटेरिअर डिझायनर कन्सल्टींग कंपनी असलेल्या या कंपनीचे स्वत:चे वेब पोर्टल आहे. या पोर्टलद्वारे ही कंपनी भारतात सर्वत्र आपली सेवा पुरविते. घराचे प्लान, कमर्शिअल इमारती, इंटेरिअर डिझाईन, फ्लोअर डिझाईन व एलिव्हेशन डिझाईनसारख्या सेवा दिल्या जातात.या कंपनीतर्फे ‘जेडीआयईटी’मध्ये घेण्यात आलेल्या कॅम्पस ड्राईव्हमध्ये सिव्हील व मेकॅनिकल इंजिनिअरिंग शाखेतील विद्यार्थी सहभागी झाले होते. सर्वप्रथम पात्र विद्यार्थ्यांची आॅनलाईन अ‍ॅप्टीट्यूड टेस्ट घेण्यात आली. यात पात्र विद्यार्थ्यांची गटचर्चा झाली. यात यशस्वी विद्यार्थ्यांची टेक्नीकल व एचआर इंटरव्ह्यूद्वारे अंतिम निवड करण्यात आली.निवड झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये सिव्हील इंजिनिअरिंग शाखेतून पूजा मोटे, ऐश्वर्या गोटेकर, शिवानी हातगावकर, संकेत कोल्हे, अब्दुल तौसिफ, मेकॅनिकल इंजिनिअरिंग शाखेतील विक्की भालतिलक, महेश देशमुख, विवेक कोरे, चंद्रकांत चौधरी, धनंजय खंजिर, पंकज बैस, शुभम ठाकरे, आकाश पेटकर, नीलेश भक्ते, अक्षय गायकवाड, दिशा रंगारी, दर्पण दीक्षित, अश्विनी वैद्य, अनिकेत जगताप, शहा मोहसीन रजा, स्वप्नील संभे, कल्याणी भोकरे, आदिश गोसावी, अजिंक्य अहेरकर, यश कुंभारे, वृषभ राजबिंडे याचा समावेश आहे. त्यांना बिझनेस डेव्हलपमेंट, बिझनेस कन्सल्टंट व सेल्स इंजिनिअर या पदावर कंपनीच्या इंदौर येथील कार्यालयात रूजू करून घेतले जाणार आहे.कंपनीतर्फे या विद्यार्थ्यांना २.२७ लाख प्रती वर्ष पॅकेज घोषित करण्यात आले आहे. कॅम्पस ड्राईव्हसाठी कंपनीतर्फे मुस्तफा जोहर, नदीम जोहर आदींनी काम पाहिले. 

टॅग्स :JDIETजेडीआयईटी