लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : स्वातंत्र्य संग्राम सेनानी तथा लोकमतचे संस्थापक संपादक जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांची जयंती येथील हिंदी प्राथमिक पाठशाळेत साजरी करण्यात आली. मुख्याध्यापक रा.बी. यादव अध्यक्षस्थानी होते. बाबूजींच्या प्रतिमेचे पूजन आणि माल्यार्पण करून कार्यक्रमाला सुरुवात झाली. याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी विचार मांडले. विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचालन सहायक शिक्षिका आरती मौर्य यांनी केले. आभार सहायक शिक्षिका संध्या देशमुख यांनी मानले. या कार्यक्रमाला विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी आदी उपस्थित होते.
हिंदी प्राथमिक शाळेत जवाहरलाल दर्डा जयंती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2019 05:00 IST