शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये निनावी पक्षांना ₹४३०० कोटींची देणगी..; राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर हल्लाबोल
2
"हिंदू राष्ट्र म्हणजे केवळ हिंदू नाही, तर..."; समाजातील दुहीवर मोहन भागवतांचं स्पष्ट भाष्य
3
अचानक राजीनामा दिल्यानंतर, काय करतायत जगदीप धनखड? पत्नी वारंवार का जात आहे राजस्थानला?
4
हृदयद्रावक! "भाऊ, सर्वनाश झाला, आपला मुन्नू गेला..."; ढसाढसा रडत मोठ्या भावाला फोन
5
पंजाबमध्ये पुरामुळे कहर, नवोदय विद्यालयात ४०० मुले आणि शाळेतील कर्मचारी अडकले; पालक प्रशासनावर संतापले
6
"खू्प कर्ज झालंय..."; सचिन-शिवानीने आधी चार वर्षाच्या मुलाला विष दिलं अन् स्वतःला संपवलं; चिठ्ठीत काय?
7
युतीचा श्रीगणेशा! उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपतीचं घेतले दर्शन
8
भारतावर 50% टॅरिफ लावून ट्रम्प यांनी स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारली, आता लागणार अमेरिकेची 'लंका'! आला असा अहवाल
9
R Ashwin: आर. अश्विन आयपीएलमधून निवृत्त, फक्त विदेशी क्रिकेट लीगमध्ये खेळणार!
10
ऑनलाईन App वरुन ऑर्डर केलं जेवण अन् डिलिव्हरी बॉयच्याच पडली प्रेमात, आता केलं लग्न
11
अष्टविनायक चित्रपटातील साधीभोळी गणेशभक्त वीणा आता दिसते अशी, अनेक वर्षे होती चित्रपटांपासून दूर
12
"सूनेने गोळी मारून हत्या केली, माझा मुलगा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता"; तीन महिन्यातच पतीची हत्या
13
अर्चनानंतर आता श्रद्धा तिवारी गायब...; कुटुंबानं मुलीचा उलटा फोटो दरवाजाच्या चौकटीला लावला
14
खळबळजनक! कॉन्स्टेबलने कुटुंबीयांच्या मदतीने पत्नीला जिवंत जाळलं, प्रकृती गंभीर
15
ChatGPT ने मुलाला आयुष्य संपवण्याचे ट्यूशन दिले, पालकांनी न्यायालयात सगळीच माहिती सांगितली
16
मुंबईच्या दिशेने मराठा मोर्चा: "शांततेचं आंदोलन कुणीच रोखू शकत नाही," मनोज जरांगेंचा निर्धार
17
"लोक ओरडत होते, मी दगड पडताना पाहिले, मला..."; वैष्णोदेवी मार्गावर नेमकं काय घडलं?
18
३६ दिवस डिजिटल अरेस्ट; सायबर ठगांनी निवृत्त एअरफोर्स अधिकाऱ्याकडून ३.२२ कोटी लुटले...
19
बाप्पाला आणताना, नेताना, पूजा करताना मूर्तीचा भाग 'दुभंगला' तर अशुभ? धर्मशास्त्र सांगते... 
20
गणेशोत्सवानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने रील स्पर्धेचे आयोजन, प्रथम क्रमांकाला एक लाखांचे बक्षीस

जनता दरबाराने समस्या निकाली

By admin | Updated: June 2, 2015 23:57 IST

उपविभागातील अनेक सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या कित्येक वर्षांपासून प्रलंबित होत्या.

मुकेश इंगोले दारव्हाउपविभागातील अनेक सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या कित्येक वर्षांपासून प्रलंबित होत्या. सामान्य नागरिकांना आपली बाजू मांडण्याची संधीच दिली जात नव्हती. पालकमंत्री संजय राठोड यांच्या जनता दरबाराच्या माध्यमातून एक माध्यम सर्वसामान्यांना उपलब्ध झाले. अनेकांच्या समस्या सुटल्या तर काहींच्या अजूनही कायम आहेत. मात्र या जनता दरबाराच्या निमित्ताने एक चांगली सुरूवात झाली आहे. थेट सामान्य नागरिक अधिकारी व कर्मचाऱ्यांना आपल्या कामाबद्दल विचारणा करू शकतात, हे यातून दिसून येते. दारव्हा उपविभागातील जनता दरबार येथील बचत भवनात पार पडला. सुरूवातीला ५१४ तक्रारीची नोंदणी झाली होती. ऐन वेळेवर आलेल्या २०२ तक्रारी स्वीकारण्याचा निर्णय झाल्यानंतर एकुण तक्रारीची संख्या ७१६ वर पोहोचली. हा जनता दरबार केवळ औपचारिकता ठरू नये याची भरपूर खबरदारी पालकमंत्र्यांनी घेतल्याने अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने सर्व काही पार पडले. अधिकाऱ्यांच्याच भरवशावर विसंबुन न राहता आपली सर्व यंत्रणा कामी लावल्यामुळे कुणावरही अतिरिक्त प्रेशर आले नाही. तक्रारीचा खच, लोकांची गर्दी यामुळे गोंधळ उडून विचका न होऊ देणे यासाठी योग्य नियोजन हाच महत्वाचा पार्ट होता. यात यशस्वी ठरल्याने सर्वांना योग्य वेळ देऊन चर्चा करता आली. टोकननुसार नंबर लावून नेमक्या लोकांना आता सोडण्यात आले. इतरांची व्यवस्था हॉलबाहेर करण्यात आली. त्याठिकाणी मार्गदर्शन करण्याकरिता टीम लावण्यात आल्या. त्यामुळे तक्रारकर्ते संबंधित कार्यालयाचे अधिकारी, कर्मचारी व पालकमंत्री यांना नीट चर्चा करून नेमकी समस्या काय आहे हे समजावून घेऊन त्यावर तोडगा काढता आला. हे सर्व यासाठी महत्वाचे ठरते की तक्रारकर्त्यांचे म्हणनेच ऐकून घेतले नसते तर त्या जनता दरबाराला काही अर्थ उरला नसता. पालकमंत्र्यांनी तक्रारकर्त्यांच्या तक्रारीवर अधिकाऱ्यांकडून आलेल्या थातुरमातुर उत्तरावर समाधानी न राहता तिथेच चर्चा करून समस्या निकाली काढण्यावर भर दिला. त्यामुळे केवळ कामाचे आश्वासन न मिळता लोकांना तत्काळ न्याय मिळाला. दोन्ही पायाने अपंग असलेला पाळोदी येथील संदीप राऊत याला तात्काळ घरकूल मंजूर करण्याचे आदेश झाले. हाच संदीप गेली कित्येक वर्ष घरकुलासाठी पंचायत समिती कार्यालयाच्या चकरा मारत होता. त्या दिवशी का त्याला नियम बनवून घरकुल देण्यात आले का, नाही तो खऱ्या अर्थाने लाभार्थी होताच. परंतु ‘दफ्तर दिरंगाई’मुळे तो आतापर्यंत या लाभापासून वंचित होता. नंदकिशोर शिवप्रसाद जयस्वाल रा. वरनोळी यांचा विजेच्या शॉकने मृत्यू झाला. मनोज हरिकृष्ण कदम रा. कुऱ्हाड याचा विहिरीत पडून मृत्यू झाला तर संगीता उल्हास राठोड रा. निळोणा हिचा सर्पदंशाने मृत्यू झाला. या सर्वांच्या वारसाना अनुक्रमे ५० हजार, एक एक लाखाची मदत मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून देण्यात आली.अनेक जणांना फेरफार नोंदविण्यासाठी त्रास दिला जात होता. तर काहींचे प्रकरणे मोजणीकरिता प्रलंबित होते. घराची बांधकाम परवानगी मिळत नाही यासारख्या छोट्या तक्रारीसुद्धा होत्या त्यामुळे सामान्य नागरिकांना कामाकरिता शासकीय कार्यालयाच्या किती चकरा माराव्या लागतात हे स्पष्ट होते. या सर्वांचे प्रश्न एका दिवसात निकाली निघाले. कृषिपंपाचे कनेक्शन डीपी, निकृष्ट साहित्य, होल्टेज मिळत नाही. याबाबत वीज वितरण कंपनीच्या मोठ्या प्रमाणात तक्रारी आल्या. त्यावर अधिकाऱ्यांनी त्यांना येणाऱ्या अडचणी पालकमंत्र्यासमोर मांडल्या हे उत्तर ग्राह्य धरत पालकमंत्र्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून वीज वितरण कंपनीच्या अडचणीदेखील दूर केल्या. त्यामुळे जनता दरबारात केवळ तक्रारकर्त्यांच्याच समस्या सुटल्या असे नाही तर विविध कार्यालयाच्याही समस्या सोडण्यात आल्या.