जय भीमचा जयघोष : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त यवतमाळ शहरात विशाल रॅली काढण्यात आली. हातात झेंडे आणि निळीची उधळण करीत शहराच्या विविध मार्गावरून ही मिरवणूक गेली तेव्हा संपूर्ण शहरवासीयांचे लक्ष वेधून घेतले. जय भीमच्या जयघोषात शहर दणाणून गेले होते. डिजेच्या तालावर अनेकांनी ताल धरला होता. बसस्थानक चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी गुरुवारी सकाळपासूनच नागरिकांची गर्दी झाली होती.
जय भीमचा जयघोष :
By admin | Updated: April 15, 2016 02:04 IST