‘वायपीएस’ची विद्यार्थिनी : पहिल्यांदाच बसणार विमानात यवतमाळ : लोकमत संस्काराचे मोती ‘ग्रीन किडस्’ या स्पर्धेत हवाई सफरची मानकरी ठरली यवतमाळ पब्लिक स्कूलची विद्यार्थिनी समीक्षा सुधाकर जाधव. सातव्या वर्गात असणारी समीक्षा नागपूर-दिल्ली-नागपूर असा विमान प्रवास करणार आहे. लोकमत मीडिया प्रा.लि.च्यावतीने आयोजित संस्काराचे मोती या स्पर्धेत जिल्ह्यातील शेकडो विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता. जिल्ह्यातील एका भाग्यवान स्पर्धकाची हवाई सफरसाठी निवड केली जाणार होती. त्याअंतर्गत समीक्षाची निवड झाली. समीक्षा जाधव ही वडगाव रोड परिसरातील देवयानीनगर येथील जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे विस्तार अधिकारी सुधाकर जाधव यांची कन्या होय. ती पहिल्यांदाच विमानात बसणार असल्याने घरात अतिशय उत्साहाचे वातावरण असून समीक्षा तर हवाई सफरसाठी निवड झाल्यापासून अतिशय आनंदात आहे. तिला विमानात बसण्याची प्रचंड उत्सुकता लागली आहे. लोकमत संस्काराची मोती स्पर्धेमुळे विद्यार्थीदशेतच विमान बसण्याची संधी मिळाल्याचे समीक्षा सांगते. (उपक्रम प्रतिनिधी)
संस्काराचे मोती स्पर्धेच्या हवाई सफरची मानकरी समीक्षा जाधव
By admin | Updated: June 23, 2015 00:32 IST