शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
4
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
5
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
6
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
7
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
8
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
9
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
10
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
11
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
12
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
13
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
14
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
15
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
16
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
17
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
18
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
20
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू

यवतमाळात जगणे झाले कठीण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2019 00:00 IST

प्रचंड उन्हाच्या झळा, तीव्र पाणीटंचाई सोसणाऱ्या यवतमाळकरांना पावसाळाही प्रचंड तापदायक ठरणार आहे. विकास कामांच्या नावाखाली शहर जागोजागी खोदण्यात आले आहे. हे खड्डे अजूनही कायम आहे. पाऊस बरसल्यानंतर या ठिकाणावरून वाहने धावताना असंख्य अपघात घडण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देसावधान : जलस्रोत दूषित, रस्त्यांवरील खोदकामे, बेसुमार वाहनांनी वाढविले प्रदूषण

जागतिक पर्यावरण दिनरूपेश उत्तरवार ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : प्रचंड उन्हाच्या झळा, तीव्र पाणीटंचाई सोसणाऱ्या यवतमाळकरांना पावसाळाही प्रचंड तापदायक ठरणार आहे. विकास कामांच्या नावाखाली शहर जागोजागी खोदण्यात आले आहे. हे खड्डे अजूनही कायम आहे. पाऊस बरसल्यानंतर या ठिकाणावरून वाहने धावताना असंख्य अपघात घडण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे दूषित पाण्यामुळे साथीचे आजार बळावण्याची दाट शक्यता आहे. भरीसभर म्हणजे लोकसंख्येच्या दुपटीहून वाहनांची संख्या झाल्याने वायू प्रदूषणही वाढले आहे. प्रदूषण कमी करण्यासाठी नगरपरिषद, सार्वजनिक बांधकाम विभाग, लोकप्रतिनिधी प्रयत्न करताना दिसत नाही. त्यामुळे यवतमाळात जगणे कठीण झाल्याची संतप्त भावना नागरिक व्यक्त करीत आहे.सांडपाणी वाहून नेणाºया नाल्या जागोजागी तुंबल्या आहेत. शहरातील मोठे नाले पावसाळ्यापूर्वी स्वच्छ करणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात नाल्यांच्या स्वच्छतेची निविदा काढण्यात आल्या नाही. आचारसंहितेमुळे ही निविदा थांबली असल्याचे नगरपरिषद प्रशासनाने स्पष्ट केले आहे.शहराच्या कामकाजाबाबत नगरपालिका प्रशासनाकडून वेळोवेळी दुर्लक्ष केल्याचे निदर्शनास येत आहे. यात पुन्हा आचारसंहितेमुळे भर पडली. नुकत्याच पार पडलेल्या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी स्वच्छतेचा आढावा घेतला. मात्र उपाययोजना सुरू झालेल्या नाहीत.अखेर नगरपरिषदेला जागयवतमाळ शहरामध्ये विकास कामे करताना वृक्ष लागवड करण्यासाठी नगरपरिषदेने २० हजार वृक्ष लावण्याचा संकल्प केला आहे.ही वृक्ष लागवड करताना शहरातील ३०० ओपन स्पेसमध्ये आणि रस्त्याच्या दुतर्फा झाडे लावली जाणार त्यासाठी ४० ते ५० लाखांचा खर्च अपेक्षित आहे.पावसाळापूर्व सफाईचा विसरशहरातील खोलगट वसाहतींमध्ये दरवर्षी पाणी साचून झोपडपट्टीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. हे नुकसान टाळण्यासाठी नाल्याचा संपूर्ण प्रवाह वळविण्यात आला आहे. याच सोबत नाल्यांची स्वच्छताही पावसापूर्वी करणे अपेक्षित होते. मात्र निविदा उघडल्याच गेल्या नाही. या निविदा देण्यापूर्वी शहरात मोठा पाऊस झाला तर मोठ्या प्रमाणात खोलगट वसाहतीमध्ये पाणी शिरुन नुकसान होण्याची शक्यता आहे. नगराध्यक्षांचे संपूर्ण अधिकार गोठविल्यामुळे प्रशासन काय उपाययोजना करते, याची माहिती नगराध्यक्षांना मिळत नाही, यातून हा गोंधळ उडाला आहे.

टॅग्स :pollutionप्रदूषण