शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

नागपूरला शक्य आहे, मग अमरावतीला का नाही?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2018 13:54 IST

आपसी करारनामा करून म्हाडा वसाहतीमधील दुय्यम गाळेधारकांना हक्क हस्तांतरणाची कार्यवाही नागपूर गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळाने (म्हाडा) केली आहे. मात्र, हीच मागणी गेल्या कित्येक वर्षांपासून यवतमाळातील दुय्यम गाळेधारक करीत आहे.

ठळक मुद्देम्हाडावर संताप दुय्यम गाळेधारक २५ वर्षांपासून हक्क हस्तांतरणाच्या प्रतीक्षेत

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : आपसी करारनामा करून म्हाडा वसाहतीमधील दुय्यम गाळेधारकांना हक्क हस्तांतरणाची कार्यवाही नागपूर गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळाने (म्हाडा) केली आहे. मात्र, हीच मागणी गेल्या कित्येक वर्षांपासून यवतमाळातील दुय्यम गाळेधारक करीत आहे. नागपूरच्या धर्तीवर अमरावती म्हाडाला अशी कार्यवाही करणे का शक्य नाही, असा सवाल गाळेधारकांनी उपस्थित केला आहे.अमरावती म्हाडा अधिनस्त यवतमाळ शहरातील विदर्भ हाउसिंग सोसायटी येथील वसाहतीमधील १३५ मूळ गाळेधारकांनी आपले गाळे आपसी करारनामा करून दुय्यम गाळेधारकांना सुपूर्द केले आहेत. या गाळ्यांमध्ये गेल्या २०-२५ वर्षांपासून हे दुय्यम गाळेधारक राहात आहेत. म्हाडाची देय रक्कम व नगरपरिषदेचा करही ते स्वत:च करीत आहेत.त्यांनी ११ मार्च २०१६ रोजी सदर गाळे आपल्या नावे करण्यासाठी अमरावती मंडळ कार्यालयात अर्ज दिले. परंतु, केवळ वेळकाढूपणा केला जात आहे, असा आरोप विदर्भ गाळेधारक गृहविकास सहकारी संस्थेचे सचिव अ‍ॅड. श्याम खंडारे यांनी केला आहे. त्याचवेळी नागपूर म्हाडाने मात्र सकारात्मक पवित्रा घेतला आहे. नागपूर मंडळाच्या अधिनस्त दुय्यम गाळेधारकांकडून अर्ज घेण्यात आले. त्यावर आक्षेप व तक्रारीसाइी जाहीर नोटीस लावण्यात आली. त्यानंतर हक्क हस्तांतरण, नियमितीकरणाची प्रक्रिया राबविणे सुरू केले आहे. असे असताना अमरावती गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळ यवतमाळच्या दुय्यम गाळेधारकांबाबत दुजाभाव का करीत आहे, असा प्रश्न अ‍ॅड. श्याम खंडारे यांनी उपस्थित केला आहे.

 

 

टॅग्स :mhadaम्हाडा