शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
4
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
5
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
6
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
7
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
8
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
9
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
10
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
11
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
12
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
13
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
14
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
15
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
16
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
17
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
18
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
19
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
20
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
Daily Top 2Weekly Top 5

क्राईम ब्रॅंच, इन्टेलिजन्समध्ये ‘एक्सपर्ट’चीच नियुक्ती बंधनकारक 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2020 07:00 IST

Police Yawatmal News  क्राईम ब्रॅंच, विशेष शाखा (गोपनीय) या महत्वाच्या ठिकाणी संबंधित प्रशिक्षित व अनुभवी पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्याचीच नियुक्ती करण्याचे बंधन पोलीस महासंचालक कार्यालयाने घालून दिलेले आहे.

ठळक मुद्देपोलीस महासंचालकांचे आदेशमात्र घटक प्रमुख पोलीस प्रमुखांकडून वेगळेच निकष

 राजेश निस्ताने    लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ :  क्राईम ब्रॅंच, विशेष शाखा (गोपनीय) या महत्वाच्या ठिकाणी संबंधित प्रशिक्षित व अनुभवी पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्याचीच नियुक्ती करण्याचे बंधन पोलीस महासंचालक कार्यालयाने घालून दिलेले आहे. परंतु प्रत्यक्षात अनेक पोलीस घटक प्रमुख महासंचालकांच्या या निर्देशांकडे डोळेझाक करून उपरोक्त महत्वाच्या शाखांमध्ये राजकीय शिफारसींवर आलेले, वसुलीतील एक्सपर्ट, जी हुजरी करणारे व मर्जीतील कर्मचाऱ्यांची नियुक्ती करीत असल्याचे प्रकार सर्रास पहायला  मिळतात. 

पोलीस महासंचालक कार्यालयाच्यावतीने विशेष पोलीस महानिरीक्षक (आस्थापना) अतुलचंद्र कुलकर्णी यांच्या स्वाक्षरीने १६ ऑक्टोबर २०१४ रोजी या नियुक्त्यांबाबत मार्गदर्शक तत्वे जारी करण्यात आली. आयुक्तालयात क्राईम ब्रॅंच, विशेष शाखा,  जिल्हा पाेलीस दलात स्थानिक गुन्हे शाखा आणि जिल्हा विशेष शाखा येथे पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्याची नियुक्ती करताना नेमकी काय खबरदारी घ्यावी याचे बंधन घालून देण्यात आले.  गुन्हे शाखेत नेमणूक करताना संबंधिताला गुन्हे अन्वेषणाचा अनुभव आहे का, त्याने प्रशिक्षण  विद्यालयातून गुन्हा अन्वेषणाचे प्रशिक्षण घेतले आहे का याची खात्री करावी,  विशेष शाखेत नेमताना संबंधिताने पुणे येथील महाराष्ट्र गुप्तवार्ता ( ईन्टेलिजन्स) प्रबोधिनीमध्ये गोपनीय माहिती गोळा करण्याचे प्रशिक्षण घेतले आहे काय, हे तपासण्याचे निर्देश दिले गेले आहेत. प्रशिक्षण व अनुभवाशिवाय नियुक्त्या होत असल्याचे आढळल्यानेच ही मार्गदर्शक तत्वे जारी केली गेली होती. मात्र आजही त्याची काटेकोर अंमलबजावणी होत नसल्याचे बहुतांश चित्र आहे. अनुभव नसलेल्या व प्रशिक्षण न घेतलेल्या पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांची क्राईम ब्रॅंच,  विशेष शाखेत नेमणूक करू नये असे स्पष्ट आदेश बजावले गेले होते. वेगळ्याच अनुभवांचे लागतात  निकष !प्रशिक्षण पूर्ण केलेेेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या नोंदी त्यांच्या सेवा अभिलेख्यात न चुकता घेण्याचे  निर्देशही  दिले गेले. मात्र या बहुतांश निर्देशांकडे दुर्लक्ष करून क्राईम ब्रॅंच व विशेष शाखेत अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सोईने नियुक्त्या केल्या जात आहेत.  या नियुक्त्यांसाठी महासंचालकांनी ठरवून दिलेल्या मार्गदर्शक तत्वांऐवजी वसुली, सरबराई, सेवेकरी, राजकीय हितसंबंध, जी हुजरी यालाच काही घटक पोलीस प्रमुखांकडून अधिक महत्व दिले जात असल्याचे आढळून येते.  

टॅग्स :Policeपोलिस