लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : अंशकालीन स्त्री परिचरांच्या समस्यांकडे जिल्हा परिषद आरोग्य विभागाचे दुर्लक्ष होत आहे. या संदर्भात महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते अंशकालीन स्त्री परिचर संघटनेतर्फे सोमवारी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.शासन निर्णयानुसार तीन हजार ५०० रुपये मानधन देण्यात यावे, सुधारित वेतनाचा लाभ १ जानेवारी २०१६ पासून असल्याने फरक बिलाची थकबाकी बँक खात्यात जमा करण्यासाठी संबंधितांना आदेश द्यावे, आरोग्य विभागातील इतर कर्मचाऱ्यांच्या वेतनाप्रमाणे मानधन १ तारखेला मिळावे, अंशकालीन स्त्री परिचरांना जिल्हा परिषदेमार्फत गणवेश देण्यात यावा आदी मागण्या या निवेदनात नमूद केल्या आहे. निवेदनावर आयटकचे जिल्हा सचिव संजय भालेराव, दिवाकर नागपुरे, प्रिया आत्राम, रेणूका कलाणे, रेखा कनाके, अर्चना मेश्राम, भागिरथा बिरंगे, रंजना ढोक, कुसूम गंधेवार, लक्ष्मीबाई जोशी आदींच्या स्वाक्षºया आहेत.
अंशकालीन स्त्री परिचरांचे प्रश्न कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2019 21:51 IST