लोकमत न्यूज नेटवर्कवडकी : राळेगाव तालुक्यातील वडकी पोलीस ठाणे ‘क’ दर्जाचे आहे. मात्र याच पोलीस ठाण्याने जिल्ह्यात सर्वप्रथम आयएसओ मानांकन प्राप्त केले आहे.वडकी पोलीस ठाण्याला २४ जानेवारी रोजी ‘आयएसओ’ दर्जा प्राप्त झाला. त्यामुळे २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिनी पालकमंत्री मदन येरावार, पोलीस अधीक्षक एम. राजकुमार याच्या उपस्थितीत ठाणेदार प्रशांत गिते यांचा यवतमाळात गौरव करण्यात आला. येथील ठाण्यात गेल्या जूनला प्रशांत गिते ठाणेदार म्हणून रुजू झाले. त्यांनी अवघ्या सहा महिन्यात पोलीस ठाण्याला आयएसओ दर्जा प्राप्त करून दिला. त्यांनी ठाण्यासाठी लोकसहभागातून नवीन वास्तू तसेच इतर सुविधा उपलब्ध करून घेतल्या आहे. दुय्यम ठाणेदार दीपक कांक्रेडवार व सर्वांनी सहकार्य केल्याने आयएसओ दर्जा प्राप्त झाल्याचे गिते यांनी सांगितले.
वडकी ठाण्याला आयएसओ मानांकन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2019 21:25 IST
राळेगाव तालुक्यातील वडकी पोलीस ठाणे ‘क’ दर्जाचे आहे. मात्र याच पोलीस ठाण्याने जिल्ह्यात सर्वप्रथम आयएसओ मानांकन प्राप्त केले आहे.
वडकी ठाण्याला आयएसओ मानांकन
ठळक मुद्देपहिलेच पोलीस ठाणे : पालकमंत्र्यांच्या हस्ते गौरव