शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
2
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
3
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
4
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
5
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
6
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
7
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
8
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
9
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
10
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
11
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
12
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
13
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
14
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
15
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
16
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
17
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
18
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
19
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!

इसापूरचा श्याम चढला पुन्हा टॉवरवर

By admin | Updated: April 21, 2016 02:48 IST

इसापूर येथील शासकीय ई-क्लास जमिनीवर रूई तलाव येथील आदिवासींना भूखंड देण्याच्या मागणीसाठी श्याम गायकवाड हा तरुण मंगळवारी मध्यरात्री येथील...

तहसील कार्यालय : आदिवासींना जागेची मागणी दिग्रस : इसापूर येथील शासकीय ई-क्लास जमिनीवर रूई तलाव येथील आदिवासींना भूखंड देण्याच्या मागणीसाठी श्याम गायकवाड हा तरुण मंगळवारी मध्यरात्री येथील तहसीलच्या टॉवरवर जाऊन चढला. टॉवरवर चढून आंदोलन करण्याची श्यामची ही पाचवी वेळ असून तळपत्या उन्हात केवळ सोबत नेलेल्या झेंड्याच्या आधाराने तो दिवसभर टॉवरवर बसून होता. टॉवरवर चढून प्रशासनाची भंबेरी उडविणारा श्याम पुन्हा टॉवरवर चढल्याचे बुधवारी सकाळी ६ वाजताच्या सुमारास लक्षात आले. यावेळी तो दिग्रस तहसील कार्यालयाच्या टॉवरवर जाऊन चढला आहे. श्यामने आपल्या सोबत झेंडे, पिण्याचे पाणी नेले आहे. आपल्या आंदोलनाबाबत श्यामने टॉवरवरून मुख्यमंत्र्यांच्या नावे लिहिलेले पत्र टाकले. त्यात रूई तलाव येथील आदिवासींना भूखंडाची मागणी केली आहे. आज दिवसभर तो तळपत्या उन्हात टॉवरवर बसून होता. सोबत नेलेल्या तीन झेंड्यांच्या सावलीत तो टॉवरवर बसून होता. प्रशासनाने त्याला खाली उतरण्याची विनंती केली. परंतु तो ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हता. वृत्त लिहेस्तोवर टॉवरवरच बसू होता. विशेष म्हणजे श्यामने ७ जुलै २०१४ व २९ आॅक्टोबर २०१५ रोजी पोलीस ठाण्याच्या टॉवरवर चढून आंदोलन केले होते. त्यानंतर १८ नोव्हेंबर २०१५ रोजी तहसीलदारांच्या कक्षात कोंडून घेतले होते. त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याने विष प्राशन करण्याचा प्रयत्न केला तर ८ जानेवारी २०१६ रोजी श्याम येथील पंचयात समितीच्या झाडावर चढून बसला होता. बुधवारी पुन्हा तो येथील तहसील कार्यालयात असलेल्या पवन ऊर्जा टॉवरवर चढून बसला आहे. प्रशासन त्याच्या आंदोलनाची कशा प्रकारे दखल घेते आणि त्याच्या मागण्या मान्य होतात काय, याकडे लक्ष लागले आहे. (प्रतिनिधी)