शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
3
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
4
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
5
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
6
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
7
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
8
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
9
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
10
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
11
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
12
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
13
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
14
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
15
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
16
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
17
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
18
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
19
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
20
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

स्थानिक गुन्हे शाखेकडे दोन डझन गुन्ह्यांचा तपास

By admin | Updated: July 30, 2016 00:43 IST

जिल्ह्यातील सर्वात महत्वाची ब्रँच म्हणून ओळखल्या जाणाऱ्या स्थानिक गुन्हे शाखेकडे दोन डझन गुन्हे तपासाला आहेत.

अधिकाऱ्यांची वाणवा : आर्थिक शाखेकडे सर्वाधिक आठ गुन्हे यवतमाळ : जिल्ह्यातील सर्वात महत्वाची ब्रँच म्हणून ओळखल्या जाणाऱ्या स्थानिक गुन्हे शाखेकडे दोन डझन गुन्हे तपासाला आहेत. परंतु सध्या या शाखेकडे तपासासाठी पुरेसे अधिकारी नसल्याचे सांगितले जाते. स्थानिक गुन्हे शाखेची धुरा वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय देशमुख यांच्या खांद्यावर आहे. यांच्या दिमतीला पोलीस निरीक्षक लष्करे, सहायक निरीक्षक पतिंगे, फौजदार मनवर यांची फौज आहे. परंतु गंभीर गुन्ह्यांच्या तपासाची व्याप्ती लक्षात घेता अधिकाऱ्यांची ही फौज कमी पडत आहे. कर्मचाऱ्यांचा आकडा मोठा दिसत असला तरी त्यातील अनेक कर्मचारी हे टेबलवरील कारकुनी कामातच व्यस्त असतात. स्थानिक गुन्हे शाखेकडे काही महिन्यांपूर्वी सुमारे ९० ते ९५ गुन्ह्यांचा तपास होता. तपासाचा वेग वाढल्याने हे गुन्हे कमी झाले आहेत. तरीही आजच्या घडीला एलसीबीकडे २४ गुन्हे तपासाला आहेत. त्यातील सर्वाधिक आठ गुन्हे आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे आहे. उर्वरित १६ गुन्ह्यांमध्ये खून, फसवणूक, आयटी अ‍ॅक्ट, अफरातफर या सारख्या गुन्ह्यांचा समावेश आहे. यातील धामणगाव रोड स्थित भरतीया यांच्याकडे झालेली लाखो रुपयांची चोरी आणि महागाव तालुक्यातील साखर घोटाळा हे पोलिसांसाठी आव्हानात्मक गुन्हे ठरले आहेत. महागावातील घोटाळ्यात महसूल व पुरवठा विभागाच्या यंत्रणेचा संबंध येत असल्याने पूर्वपरवानगी घेऊनच तपास करावा लागत असल्याचे सांगितले जाते. सुशिक्षितांना लालसा भोवली ग्रामीण अशिक्षित जनता आमिषाला बळी पडून फसविली जाणे समजण्यासारखे आहे. परंतु शहरातील उच्चभ्रू आणि सुशिक्षित नागरिकसुद्धा लालसेला बळी पडून गंडविले जात असल्याची काही प्रकरणे पुढे आली आहे. जादा व्याजदर, दुप्पट मोबदला अशा चक्रव्युहात ही प्रतिष्ठीत मंडळी अडकल्याने फसविली गेली आहे. बँका, पतसंस्थांनी फसविल्याची अनेक प्रकरणे आहेत. वित्तीय संस्थांकडून व्यवहारात फसवणूक झाल्याचे आठ गुन्हे आर्थिक गुन्हे शाखेकडे तपासाला आहेत. यातील भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टीस्टेट पतसंस्थेतील ५२ लाखांच्या फसवणुकीचा गुन्हा नुकताच सीआयडीला वर्ग झाला. जागृती अ‍ॅग्रो फुडस् अ‍ॅन्ड इन्फ्रा या कंपनीने शेतकरी गुंतवणूकदारांना पाच कोटीने फसविले आहे. याचा तपास सध्या आर्थिक गुन्हे शाखा करीत आहे. (जिल्हा प्रतिनिधी) जागृती अ‍ॅग्रो फुडस्ची संचालिका न्यायालयीन कोठडीत जागृती अ‍ॅग्रो फुडस्ने जिल्ह्यात पाच कोटी रुपयांनी शेतकऱ्यांची फसवणूक केली. शेतीपूरक व्यवसायात ७० महिन्यात दहापट मोबदल्याचे आमिष देऊन ही फसवणूक झाली आहे. या प्रकरणात नऊ आरोपी असून जाई राज गायकवाड या प्रमुख संचालिकेला भंडारा जिल्ह्याच्या लाखणी पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आले होते. शुक्रवारी तिची पोलीस कोठडीची मुदत संपल्याने न्यायालयीन कोठडीत पाठविण्यात आले. तिला ताब्यात घेण्यासाठी अमरावती, बुलडाणा, सोलापूर, चंद्रपूर पोलिसही प्रयत्नरत असल्याचे सांगण्यात आले.