शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
3
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
4
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
5
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
6
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
7
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
8
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
9
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
10
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
11
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
12
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
13
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
14
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
15
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
16
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
17
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
18
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
19
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
20
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
Daily Top 2Weekly Top 5

दिग्रसमध्ये दहा हजार नागरिकांची तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2020 05:00 IST

तालुक्यात कोरोना रुग्णांनी शंभरी पार केली आहे. एकूण रुग्णांची संख्या १०९ वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत दोन जणांचे मृत्यू झाले आहे. आतापर्यंत १०९ नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे. दररोज पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये भर पडत आहे. मात्र १०९ पैकी ६७ नागरिकांनी कोरोनावर मात केली आहे. एकूण बाधितांपैकी दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

ठळक मुद्देशिक्षकांची ३३ पथके : कोरानाची भीती, शहराच्या ११ प्रभागात आरोग्य सर्वेक्षण

लोकमत न्यूज नेटवर्कदिग्रस : शहरात कोरोनाचे तांडव सुरू आहे. अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. त्यामुळे शहरातील दहा हजार नागरिकांची आरोग्य तपासणी सुरू करण्यात आली. त्यासाठी ३३ पथकांची निर्मिती करण्यात आली.तालुक्यात कोरोना रुग्णांनी शंभरी पार केली आहे. एकूण रुग्णांची संख्या १०९ वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत दोन जणांचे मृत्यू झाले आहे. आतापर्यंत १०९ नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे. दररोज पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये भर पडत आहे. मात्र १०९ पैकी ६७ नागरिकांनी कोरोनावर मात केली आहे. एकूण बाधितांपैकी दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तूर्तास तालुक्यात ५० अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्ण आहे. त्यांच्यावर यवतमाळ येथे उपचार सुरू आहे. प्रशासन आपल्या परीने उपाययोजना करीत आहे. कोरोनाला रोखण्यासाठी २८ जुलैपर्यंत शहरात लॉकडाऊन जाहीर आहे. आता प्रशासनाने शहरातील दहा हजार नागरिकांची आरोग्य तपासणी सुरू केली आहे. त्यासाठी ३३ पथकांची निर्मिती करण्यात आली.प्रत्येक प्रभागात तीन पथकांद्वारे आरोग्य सर्वेक्षण सुरू आहे. त्यासाठी ३३ शिक्षकांची नेमणूक करण्यात आली. हे शिक्षक ऑक्सिमीटर आणि थर्मल स्कॅनरद्वारे नागरिकांची तपासणी करीत आहे. तसेच तपासणी करताना नागरिकांना मास्क लावणे, सॅनिटायझरचा वापर, हात धुणे, घर व परिसर स्वच्छ ठेवण्याबाबत मार्गदर्शन करीत आहे.सर्वेक्षणात मधुमेह, उच्च रक्तदाब, आरएलआय, सारी आदी लक्षणे आढळलेल्या नागरिकांची वेगळी यादी तयार केली जात आहे. संजय गुडपिल्लेवार, विजय झंवर, प्रशांत पाटील, अशोक कायंदे, दीपक बरडे, किरण गोविंदवार, भाऊ बोंद्रे आदी शिक्षक सर्वेक्षणात गुंग आहे. या सर्वेक्षणाची माहिती दररोज तालुकास्तरीय आपत्ती व्यवस्थापन समितीला दिली जात आहे. यामुळे कोरोनाला आळा बसण्याची शक्यता वर्तविली जात आहे.लॉकडाऊनमुळे शहरातील रस्त्यांवर शुकशुकाटपुसद व दिग्रस शहरात २२ ते २८ जुलैदरम्यान संपूर्ण लॉकडाऊन घोषित करण्यात आला. त्यामुळे शहरातील रस्त्यांवर शुकशुकाट दिसून येत आहे. प्रशासन कोरोनाला आळा घालण्यासाठी उपाययोजना करीत आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार सर्व प्रभागातील नागरिकांची आरोग्य तपासणी सुरू करण्यात आली आहे. मात्र काही विघ्नसंतोषी प्रशासनाच्या उपाययोजना विघ्न आणत आहे. यातून दोनच दिवसांपूर्वी ग्रामीण रुग्णालयात राडा झाला होता.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या