दिग्रसमध्ये दहा हजार नागरिकांची तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2020 05:00 AM2020-07-28T05:00:00+5:302020-07-28T05:00:14+5:30

तालुक्यात कोरोना रुग्णांनी शंभरी पार केली आहे. एकूण रुग्णांची संख्या १०९ वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत दोन जणांचे मृत्यू झाले आहे. आतापर्यंत १०९ नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे. दररोज पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये भर पडत आहे. मात्र १०९ पैकी ६७ नागरिकांनी कोरोनावर मात केली आहे. एकूण बाधितांपैकी दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

Investigation of ten thousand citizens in Digras | दिग्रसमध्ये दहा हजार नागरिकांची तपासणी

दिग्रसमध्ये दहा हजार नागरिकांची तपासणी

Next
ठळक मुद्देशिक्षकांची ३३ पथके : कोरानाची भीती, शहराच्या ११ प्रभागात आरोग्य सर्वेक्षण

लोकमत न्यूज नेटवर्क
दिग्रस : शहरात कोरोनाचे तांडव सुरू आहे. अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. त्यामुळे शहरातील दहा हजार नागरिकांची आरोग्य तपासणी सुरू करण्यात आली. त्यासाठी ३३ पथकांची निर्मिती करण्यात आली.
तालुक्यात कोरोना रुग्णांनी शंभरी पार केली आहे. एकूण रुग्णांची संख्या १०९ वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत दोन जणांचे मृत्यू झाले आहे. आतापर्यंत १०९ नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे. दररोज पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये भर पडत आहे. मात्र १०९ पैकी ६७ नागरिकांनी कोरोनावर मात केली आहे. एकूण बाधितांपैकी दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तूर्तास तालुक्यात ५० अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्ण आहे. त्यांच्यावर यवतमाळ येथे उपचार सुरू आहे. प्रशासन आपल्या परीने उपाययोजना करीत आहे. कोरोनाला रोखण्यासाठी २८ जुलैपर्यंत शहरात लॉकडाऊन जाहीर आहे. आता प्रशासनाने शहरातील दहा हजार नागरिकांची आरोग्य तपासणी सुरू केली आहे. त्यासाठी ३३ पथकांची निर्मिती करण्यात आली.
प्रत्येक प्रभागात तीन पथकांद्वारे आरोग्य सर्वेक्षण सुरू आहे. त्यासाठी ३३ शिक्षकांची नेमणूक करण्यात आली. हे शिक्षक ऑक्सिमीटर आणि थर्मल स्कॅनरद्वारे नागरिकांची तपासणी करीत आहे. तसेच तपासणी करताना नागरिकांना मास्क लावणे, सॅनिटायझरचा वापर, हात धुणे, घर व परिसर स्वच्छ ठेवण्याबाबत मार्गदर्शन करीत आहे.
सर्वेक्षणात मधुमेह, उच्च रक्तदाब, आरएलआय, सारी आदी लक्षणे आढळलेल्या नागरिकांची वेगळी यादी तयार केली जात आहे. संजय गुडपिल्लेवार, विजय झंवर, प्रशांत पाटील, अशोक कायंदे, दीपक बरडे, किरण गोविंदवार, भाऊ बोंद्रे आदी शिक्षक सर्वेक्षणात गुंग आहे. या सर्वेक्षणाची माहिती दररोज तालुकास्तरीय आपत्ती व्यवस्थापन समितीला दिली जात आहे. यामुळे कोरोनाला आळा बसण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

लॉकडाऊनमुळे शहरातील रस्त्यांवर शुकशुकाट
पुसद व दिग्रस शहरात २२ ते २८ जुलैदरम्यान संपूर्ण लॉकडाऊन घोषित करण्यात आला. त्यामुळे शहरातील रस्त्यांवर शुकशुकाट दिसून येत आहे. प्रशासन कोरोनाला आळा घालण्यासाठी उपाययोजना करीत आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार सर्व प्रभागातील नागरिकांची आरोग्य तपासणी सुरू करण्यात आली आहे. मात्र काही विघ्नसंतोषी प्रशासनाच्या उपाययोजना विघ्न आणत आहे. यातून दोनच दिवसांपूर्वी ग्रामीण रुग्णालयात राडा झाला होता.

Web Title: Investigation of ten thousand citizens in Digras

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.