शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

अवैध खरेदीचा एपीएमसीला फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2018 22:01 IST

वणी शहरातील विविध भागात असलेल्या अवैध धान्य खरेदी केंद्रांमुळे वणी बाजार समितीला चांगलाच फटका बसत आहे. शुक्रवारी बाजार समितीच्या पथकाने अशा तीन केंद्रावर धाडी टाकल्या. तत्पूर्वी संभाजी ब्रिगेडनेदेखिल बुधवारी नांदेपेरा मार्गावर सुरू असलेल्या एका केंद्रावर धाड टाकून पोलखोल केली.

ठळक मुद्देधाडसत्राने धान्य व्यापारी हादरले : वणी शहरात १५ पेक्षा अधिक अवैध केंद्रे

लोकमत न्यूज नेटवर्कवणी : वणी शहरातील विविध भागात असलेल्या अवैध धान्य खरेदी केंद्रांमुळे वणी बाजार समितीला चांगलाच फटका बसत आहे. शुक्रवारी बाजार समितीच्या पथकाने अशा तीन केंद्रावर धाडी टाकल्या. तत्पूर्वी संभाजी ब्रिगेडनेदेखिल बुधवारी नांदेपेरा मार्गावर सुरू असलेल्या एका केंद्रावर धाड टाकून पोलखोल केली.वणी तालुक्यात सोयाबीनची कापणी झाली असून हे सोयाबीन विक्रीसाठी वणी येथे आणले जात आहे. या शेतकऱ्यांनी धान्य खासगी व्यापाऱ्यांनाच विकावे, यासाठी काही दलाल सक्रिय झाले असून शेतकºयांना भुलथापा देऊन हे दलाल शेतकऱ्यांचा माल खासगी व्यापाऱ्यांच्या दारात नेत आहेत. रोखेत चुकारा मिळत असल्याने शेतकरीदेखिल खासगी व्यापाऱ्यांकडे धान्यविक्रीसाठी वळत असल्याचे चित्र आहे. मात्र हा व्यवहार गैरकायदेशीर आहे. शहरात अनेक व्यापाऱ्यांनी धान्य खरेदीसाठी दुकाने उघडली आहेत. नियमानुसार परवानाधारक व्यापाऱ्यांना बाजार समितीच्या यार्डातच धान्य खरेदी करावी लागते. परंतु बाजार समितीचा सेस चुकविण्यासाठी या व्यापाऱ्यांनी बाजार समितीच्या यार्डाबाहेर परस्पर धान्य खरेदीचा सपाटा सुरू केला. यामुळे केवळ बाजार समितीलाच नाही, तर शासनाच्या तिजोरीलादेखिल फटका बसत आहे. बाजार समितीच्या यार्डात धान्य खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांना बाजार समितीचा सेस चुकता करावा लागतो. सोबतच शासनाची बाजार फि अदा करावी लागते. मात्र अनेक व्यापारी हे टाळण्यासाठी स्वतंत्र दुकानदारी उघडून धान्य खरेदी करीत आहे. वणी शहरात १५ पेक्षा अधिक असे खरेदीदार असल्याची माहिती आहे. बाजार समितीने कारवाईचा धडाका असाच सुरू ठेवला, तर त्याचा फायदा बाजार समितीला होणार आहे. बाजार समिती कारवाई करीत असली तरी त्यात राजकीय दबाव येण्याची शक्यता आहे.बाजार समितीची तीन व्यापाऱ्यांना नोटीस४वणी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पथकाने वणी शहरातील तीन प्रतिष्ठानांवर धाडी टाकून अवैधरित्या खरेदी केलेले ६० लाख रूपये किंमतीचे सोयाबीन जप्त केले होते. या तिनही व्यापाऱ्यांना बाजार समितीने शनिवारी नोटीस दिली. व्यापाऱ्यांनी बुडविलेला सेस, बाजार फी व त्यावरील दंडाची रक्कम २४ तासाच्या आत बाजार समितीकडे जमा करावी, अन्यथा फौजदारी स्वरूपाची कारवाई करण्यात येईल, असा इशारा नोटीसमधून देण्यात आला आहे. यातून दंड, सेस व बाजार फीसाठी बाजार समितीला व्यापाºयांकडून दोन लाख ४९ हजार २६० रूपये दंडापोटी मिळणार आहे.

टॅग्स :Market Yardमार्केट यार्ड