शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

आरटीओत खासगी कर्मचाऱ्यांचा हस्तक्षेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2019 06:00 IST

आरटीओ कार्यालयात सर्वाधिक वर्दळ असते. नव्या वाहनांची नोंदणी, जुन्या वाहनांचे फिटनेस सर्टिफिकेट, वाहनांचे ट्रान्सपर, शिकाऊ परवाने, नियमित परवाने अशा एक ना अनेक स्वरूपाची कामे येथून केली जातात. या ठिकाणी कर्मचारी वर्गही उपलब्ध आहे. आता तर मोटर वाहन निरीक्षकांची मोठी फौज मिळाली आहे. एकाच वेळी २१ अधिकारी दिमतीला आल्याने कामाचा भार कमी झाला आहे.

ठळक मुद्देकेवळ दोघांंना मंजुरी : नियमित कर्मचाऱ्यांनी ठेवले खासगी नोकर

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात एजंटराज बºयाचअंशी नियंत्रणात आला आहे. ऑनलाईन प्रक्रिया असल्याने हा बदल दिसत आहे. मात्र आता येथील पूर्णवेळ कर्मचाºयांनी आपल्या हाताखाली खासगी नोकर ठेवले आहे. त्यांच्या माध्यमातूनच अतिशय जोखमीची कामे करवून घेतली जात आहे. यातूनच आरटीओ कार्यालयात काही दिवसांपूर्वी मारहाणीचा प्रकारही घडला होता. त्यानंतरही याबाबत वरिष्ठांची चुप्पी असल्याचे दिसून येते.आरटीओ कार्यालयात सर्वाधिक वर्दळ असते. नव्या वाहनांची नोंदणी, जुन्या वाहनांचे फिटनेस सर्टिफिकेट, वाहनांचे ट्रान्सपर, शिकाऊ परवाने, नियमित परवाने अशा एक ना अनेक स्वरूपाची कामे येथून केली जातात. या ठिकाणी कर्मचारी वर्गही उपलब्ध आहे. आता तर मोटर वाहन निरीक्षकांची मोठी फौज मिळाली आहे. एकाच वेळी २१ अधिकारी दिमतीला आल्याने कामाचा भार कमी झाला आहे. आरटीओतील बहुतांश कामे आॅनलाईन पद्धतीने होत असल्याने पूर्वीपेक्षा कामाचा भार तुलनेने कमी झाला आहे. त्यानंतरही येथील कर्मचारी स्वत:च्या पदरी खासगी नोकर बाळगून आहे. पूर्वी एजंटांचा धुमाकूळ आरटीओ कार्यालयात होता. त्याची जागा खासगी कर्मचाऱ्यांनी घेतली आहे.परिवहन आयुक्तांकडून केवळ दोन खासगी कर्मचाऱ्यांना कंत्राटी तत्वावर नियुक्तीची परवानगी मिळाली आहे. मात्र या व्यतिरिक्तही दिनेश, नीलेश (आस्थापना), राकेश (मॅडमकडे), बबलू, नितीन (दोघेही तळ मजल्यावर), राजू (शिकाऊ परवाना), गौतम (ट्रायल नोंदणी कक्ष), रिंकू (ट्रॅकवर), बलदेव (कॅम्प) हे खासगी कर्मचारी कार्यरत आहेत. यांचा थेट कामात हस्तक्षेप आहे. अनेक कर्मचाऱ्यांकडे अधिकारी व कर्मचाºयांच्या आॅनलाईन पासवर्ड व डीआयसी आहेत. त्यामुळे महत्वपूर्ण कागदपत्रांना ऑनलाईन मान्यता देण्याचे काम येथून केले जाते.खासगी कर्मचाऱ्यांना वरकमाईची खुली सुट आहे का ?पदरी खासगी कर्मचारी ठेऊन एक पुरक यंत्रणाच आरटीओ कार्यालयात उभी केली आहे. कर्मचारी पदरी कार्यरत असलेल्या खासगी कर्मचाºयांना खरोखरच वेतन देतात की वरकमाईची त्यांना खुली सूट दिली आहे, हाही प्रश्न येथे उपस्थित केला जात आहे. अशा प्रकारे खासगी कर्मचाºयांना ठेऊन कारभार चालविण्याचा नैतिक अधिकार आहे का हाही प्रश्न येथे उपस्थित होत आहे. आरटीओतील खासगी कर्मचाºयांना पायबंद घालण्यासाठी स्थानिक पातळीवर कोणतेच प्रयत्न होताना दिसत नाही. दोन अधिकृत खासगी कर्मचारी असताना इतरांनासुद्धा कायम ठेवण्यामागे नेमका कोणता उद्देश आहे, हे अद्याप उलगडलेले नाही.

टॅग्स :Rto officeआरटीओ ऑफीस