शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

यवतमाळात आंतरराष्ट्रीय सिन्थेटिक ट्रॅक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2018 22:00 IST

येथील नेहरु स्टेडियमवर आंतरराष्ट्रीय दर्जाचा ४०० मीटर लांबीचा सिन्थेटिक ट्रॅक (धावपथ) साकारण्यात येणार आहे. नगरविकास विभागाच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून या ट्रॅकसाठी ६ कोटी ८३ लाखांचा निधी मंजूर केला आहे. १५ आॅगस्टनंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे.

ठळक मुद्देपावणे सात कोटींचा निधी : नेहरु स्टेडियमवर नऊ महिन्यात पूर्ण होणार ट्रॅक

नीलेश भगत।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : येथील नेहरु स्टेडियमवर आंतरराष्ट्रीय दर्जाचा ४०० मीटर लांबीचा सिन्थेटिक ट्रॅक (धावपथ) साकारण्यात येणार आहे. नगरविकास विभागाच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून या ट्रॅकसाठी ६ कोटी ८३ लाखांचा निधी मंजूर केला आहे. १५ आॅगस्टनंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे.नऊ महिन्यात हा ट्रॅक पूर्ण करण्याचे नियोजन आहे. सदर ट्रॅक आंतरराष्ट्रीय अ‍ॅथ्लेटीक्स फेडरेशनच्या मानकानुसार तयार केला जाणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग व चिनी अभियंत्यांनी नेहरु स्टेडियमला नुकतीच भेट देऊन जागेची पाहणी केली. हा ट्रॅक जिल्हा क्रीडा संकूल समितीस हस्तांतरित करण्यात येणार असून त्याच्या देखभाल व दुरुस्तीची जबाबदारी समितीकडे राहणार आहे. सिन्थेटिक ट्रॅक झाल्यावर धावपटूंना भरपावसातही सराव करणे शक्य होणार आहे.फुटबॉल मैदानही होणारट्रॅकच्या आतील बाजूस कृत्रिम गवताचे फुटबॉल मैदान तयार केले जाणार आहे. मैदानावर पाणी शिंपडण्याकरिता कृत्रिम गवताच्या खाली हायड्रोलिक स्प्रिंकलर लावण्यात येईल. विशिष्ट दाब देऊन तुषार सुरू केले जातील.या आधुनिक मैदानामुळे जिल्ह्यातील फुटबॉल पटूंना राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठी येथेच सराव करणे शक्य होणार आहे.विदर्भातील तिसरा ट्रॅकयवतमाळात होणारा हा सिन्थेटिक ट्रॅक विदर्भातील तिसरा असणार आहे. मानकापूर (नागपूर) येथे हा ट्रॅक असून चंद्रपुरात त्याचे काम सुरू आहे.असा असेल ट्रॅकसिन्थेटिक ट्रॅक तीन लेअरचा असेल. पहिल्या थरामध्ये संपूर्ण ट्रॅक खोदून खडीकरण व डांबरीकरण होईल. त्यावर पॉलियरेथेनचे कोट लावल्या जाईल. दुसऱ्या थरामध्ये ट्रॅक स्वच्छ करून त्यावर एसबीआर रबर कोटींग, त्यावर लाल व दाणेदार माती टाकली जाईल. तिसऱ्या थरामध्ये ईपीडीएम ग्रॅन्यूल्सचे कोटींग व त्यावर सहा किंवा आठ लेनचे मार्किंग केले जाणार आहे.