शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

यवतमाळात वैदिक पद्धतीने पार पडला आंतरराष्ट्रीय समलिंगी विवाह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2018 10:07 IST

सुखवस्तू देशांमध्ये आणि विलासी कुटुंबांमध्येच समलिंगी विवाहाची टूम असावी, असा यवतमाळच्या सामान्य माणसाचा समज होता. आपल्या गावात असे घडूच शकत नाही, या भ्रमात असलेल्या यवतमाळकरांना सध्या एका विवाहाने अचंब्यात टाकले आहे.

ठळक मुद्देहॉटेलमधील समारंभात यवतमाळ-चीनच्या तरुणांची लग्नगाठवऱ्हाड्यांमध्ये १० समलिंगी जोडप्यांचा समावेश

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : सुखवस्तू देशांमध्ये आणि विलासी कुटुंबांमध्येच समलिंगी विवाहाची टूम असावी, असा यवतमाळच्या सामान्य माणसाचा समज होता. आपल्या गावात असे घडूच शकत नाही, या भ्रमात असलेल्या यवतमाळकरांना सध्या एका विवाहाने अचंब्यात टाकले आहे. चक्क दोन तरुणांनी एकत्र येत एकमेकांशी विवाह केला. तोही यवतमाळच्या एका नामांकित हॉटेलमध्ये.येथील स्टेट बँक चौकातील हॉटेलच्या परिसरात ३० डिसेंबरच्या रात्री हा समारंभ पार पडला. विशेष म्हणजे, देश विदेशातील निवडक ७०-८० वऱ्हाडी मंडळींना यावेळी मेजवानी देण्यात आली.या लग्नातील उपवर वधू आणि वर हे दोन्ही पुरुषच आहेत. यवतमाळातील एका फोटो स्टुडिओचा वारस या जोडीतील एक आहे. तो गेल्या काही वर्षांपासून कॅलिफोर्नियामध्ये (अमेरिकेत) स्थायिक झाला आहे. तेथील ग्रिनकार्डही त्याला मिळालेले आहे. नामांकित इलेक्ट्रॉनिक कंपनीत तो महत्त्वाच्या पदावर कार्यरत आहे. त्याचे कुटुंबीय मात्र यवतमाळातच आहेत. अमेरिकेत राहणाऱ्या या यवतमाळकर तरुणाला चीनमधील ‘व्हिन’ नामक तरुण आवडला. सुरूवातीला ओळख, नंतर मैत्री आणि शेवटी प्रेम झाले. ही अजब प्रेमकहाणी लग्नबेडीत अडकण्यासाठी सज्ज झाली.आपले आईवडील यवतमाळात आहे म्हणून लग्नही यवतमाळातच करण्याचे ठरले. ३० डिसेंबरला ‘नवरा नवरी’ येथे आले. ‘गेट टू गेदर’ करायचे अशा नावाने हॉटेल बुक करण्यात आले आणि सायंकाळी धुमधडाक्यात लग्न उरकले. या समारंभाला यवतमाळातील क्वचितच कोणी उपस्थित होते. मात्र, अमेरिका, चीनमधून ५०-६० मित्र आले होते. त्यात १० समलिंगी जोडप्यांचाही समावेश होता.दुसºया दिवशी या समलिंगी विवाहाची वार्ता कळताच सर्वसामान्य यवतमाळकरांनी मात्र तोंडात बोटे घातली. तर नवपरिणित दाम्पत्य मात्र मधुचंद्राला निघून गेले. दरम्यान, आमच्या हॉटेलमध्ये फक्त गेट टू गेदर झाले. लग्न झाले का याविषयी माहिती नसल्याचे संबंधित हॉटेलच्या व्यवस्थापकांनी ‘लोकमत’ला सांगितले.आईचा विरोध झुगारलायवतमाळातील या तरुणाच्या अशा समलिंगी विवाहाला त्याच्या आईचा विरोध होता. मात्र, मुलाच्या मर्जीपुढे तिचे काही चालले नाही. लहानपणापासून हुशार असलेला आपला मुलगा आज अमेरिकेत चांगल्या पगाराची नोकरी करतो, एखाद्या सुस्वरुप तरुणीशी त्याचे लग्न लावावे हे आईचे स्वप्न चकनाचूर झाले. शेवटी चीनमधील तरुणाशीच त्याने लग्न केले. लग्नाच्या पूर्वी या समलिंगी जोडप्याने यवतमाळातील चार-पाच प्रतिष्ठितांच्या घरी जाऊन त्यांचे आशीर्वाद घेतल्याचीही चर्चा आहे. हॉटेलमधील समारंभात या समलिंगी जोडप्याला हळद लावून, अंतरपाट धरून रितसर वैदिक पद्धतीने विवाह पार पडला.

टॅग्स :Internationalआंतरराष्ट्रीय