शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्र्यांचा घरकुल लाभार्थ्यांशी संवाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2019 22:09 IST

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विविध घरकूल योजनांच्या लाभार्थ्यांशी व्हीसीद्वारे संवाद साधला. ‘लोकसंवाद’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांनी प्रधानमंत्री आवास योजना, रमाई आवास योजना, शबरी आवास योजना, पंडित दीनदयाल उपाध्याय जमीन खरेदी योजनेच्या लाभार्थ्यांशी मंत्रालयातून संवाद साधला.

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विविध घरकूल योजनांच्या लाभार्थ्यांशी व्हीसीद्वारे संवाद साधला. ‘लोकसंवाद’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांनी प्रधानमंत्री आवास योजना, रमाई आवास योजना, शबरी आवास योजना, पंडित दीनदयाल उपाध्याय जमीन खरेदी योजनेच्या लाभार्थ्यांशी मंत्रालयातून संवाद साधला.यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयात २१ लाभार्थी उपस्थित होते. यात यवतमाळ, बाभूळगाव, नेर, उमरखेड आणि दिग्रस येथील घरकूल लाभार्थ्यांचा समावेश होता.लाभार्थ्यांशी चर्चा करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजनांची राज्यात यशस्वीपणे अंमलबजावणी सुरू आहे. २०२२ पर्यंत सर्वांना घरे देण्याचे केंद्र शासनाचे उद्दिष्ट आहे. राज्यात २०१९ अखेरपर्यंत सर्वांना घरकूल योजनेचा लाभ देण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. ग्रामीण भागात १२ लाख घरकूल देण्याचे उद्दिष्ट आहे. सद्यस्थितीत सहा लाख घरे बांधण्यात आली आहेत. उर्वरीत घरकूल वर्षभरात पूर्ण करण्याचा संकल्प असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.पाच ब्रासपर्यंत मोफत रेतीमुख्यमंत्री म्हणाले, प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत घरकूल बांधण्यासाठी लाभार्थ्यांना पाच ब्रासपर्यंत वाळू रॉयल्टीविना मोफत देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. घराचा नकाशा तयार करण्यासाठी लागणारी रक्कम कमी करण्याचा शासनाकडून प्रयत्न करण्यात येईल, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

टॅग्स :Chief Ministerमुख्यमंत्री