शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड यांच्या राजीनाम्याचं टायमिंग अनेकांना न पटण्यासारखे; 'त्या' ३ तासांत काय घडले?
2
एकदा- दोनदा नाही, एअर इंडियाला सहा महिन्यात ९ कारणे दाखवा नोटीस बजावल्या; सरकारची माहिती
3
जगदीप धनखड यांचा उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा; प्रकृतीच्या कारणास्तव निर्णय
4
आजचे राशीभविष्य, २२ जुलै २०२५: 'या' २ राशींसाठी लाभदायी दिवस, अचानक धनलाभ होईल
5
'आम्ही अणुकार्यक्रम सुरूच ठेवणार', युरोपीय देशांशी चर्चेपूर्वी इराणचा अमेरिकेला संदेश
6
पहिला दिवस गोंधळाचा; विरोधक झाले आक्रमक; पहलगाम हल्ला ते बिहार मतदारयादीवरून गोंधळ 
7
शाळेवर विमान कोसळून २० ठार; बांगलादेशात अहमदाबादची पुनरावृत्ती!
8
एअर इंडिया विमानाचे तीन टायर फुटले; विमानतळावर लँडिंगच्या वेळी पावसामुळे विमानाने धावपट्टी सोडली
9
मुख्यमंत्र्यांनी कोकाटेंना सुनावले; जे काही घडले ते भूषणावह नाही!
10
ब्रिगिट मॅक्रॉन ‘पुरुष’? खटले आणि वादांना ऊत! दाव्याची सत्यता काय?
11
अंधेरी मेट्रो स्थानकात गळती; पाणी गोळा करण्यासाठी बादल्यांचा वापर
12
भाजपचा नवा फॉर्म्युला; प्रत्येक आमदाराची पाच कामे होणार! पालिका निवडणुकीसाठी रणनीती
13
परिचारिकांच्या संपामुळे पाच दिवसांपासून रुग्णांचे हाल; नियमित शस्त्रक्रियाही पूर्णपणे बंद
14
विधवा महिलेस १.२० लाखात गुजरातेत विकले, दोन वर्षांनी पुत्रप्राप्तीनंतर आणून गावात सोडले!
15
सोळावे वरीस... धोक्याचे नव्हे, निवडणुकीत मत देण्याचे! ब्रिटनचा धाडसी निर्णय; युवाशक्ती लोकशाहीत सहभागी!
16
शेअर ट्रेडिंगच्या बहाण्याने वृद्धेसह पायलटला १० कोटींचा गंडा; बनावट ॲपचा वापर करून लावला चुना
17
६३ खासदार म्हणतात, न्या. वर्मांना पदावरून हटवा! कारण काय?
18
संपादकीय : नामुष्कीचा बॉम्ब, १९ वर्षांनंतरही पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह
19
विशेष लेख : कुणी काय खावे, याच्याशी सरकारचा काय संबंध?
20
महाराष्ट्रातील ४ लाख शेतकरी लाभार्थी यादीतून झाले गायब; लाभार्थी १०.२ लाखांवरून केवळ १५ हजारांवर

केंद्रीय चमूचा शेतकऱ्यांशी संवाद

By admin | Updated: April 28, 2015 01:31 IST

केंद्र शासनाच्या विपणन व धोरण विभागाच्या आर्थिक सल्लागार सुनीता छिब्बा यांनी सोमवारी येथील बचत

यवतमाळ : केंद्र शासनाच्या विपणन व धोरण विभागाच्या आर्थिक सल्लागार सुनीता छिब्बा यांनी सोमवारी येथील बचत भवनात आत्महत्याग्रस्त कुटुंबाला दिली जाणारी मदत आणि पुनर्वसन कामाचा आढावा घेतला. काही ठिकाणी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन चर्चा केली. यावेळी विभागीय आयुक्त ज्ञानेश्वर राजुरकर, जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मल्लीनाथ कलशेट्टी, निवासी उपजिल्हाधिकारी राजेश खवले, उमरखेडचे उपविभागीय अधिकारी दीपक सिंगला, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गायकवाड आदी उपस्थित होते. यावेळी सुनीता छिब्बा यांनी समन्वयित कृषी विकास प्रकल्प, आत्मा, कृषी विभाग, सहकार विभागाच्यावतीने होत असलेल्या कामांची माहिती घेतली. शेतकरी आत्महत्या आणि त्यामागील कारणे त्यांनी जाणून घेतली. शेतकऱ्यांसाठी अधिकाधिक कामे व्हावी, अशी सूचना त्यांनी केली. या प्रसंगी विविध विभागांनी पॉवर पॉर्इंट प्रेझेंटेशनव्दारे शेतकऱ्यांसाठी राबविल्या जाणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली. यानंतर छिब्बा यांनी लगतच्या मोहा गावातील जामडोह पोडला भेट दिली. या गावातील संतोष कुंभेकर या शेतकऱ्याने आत्महत्या केली होती. त्याच्या कुटुंबीयांशी चर्चा केली. येरद, चिचघाट तसेच कळंब तालुक्यातील जोडमोहा आणि खटेश्वर येथेही आत्महत्याग्रस्त कुटुंंबाची त्यांनी भेट घेतली. यावेळी विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी माने, तहसीलदार अनुप खांदे, कळंबचे तहसीलदार संतोष काकडे यांच्यासह कृषी विभागाचे अधिकारी उपस्थित होते. तिरझडाकडे पाठकळंब तालुक्याच्या तिरझडा या गावात सर्वाधिक आत्महत्या झाल्या. आर्थिक सल्लागार सुनीता छिब्बा यांची या गावाला नियोजित भेट होती. मात्र ऐनवेळी त्यांचा दौरा बदलला. त्यामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त केली. खटेश्वर येथील लक्ष्मण गंगाराम काकडे आणि जोडमोहा येथील शामराव लक्ष्मण आडे या कुटुंबाचे प्रश्न छिब्बा यांनी जाणून घेतले.