शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

टोळीचा सदस्य होण्याऐवजी शिक्षणात लक्ष द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2019 21:13 IST

यवतमाळातील युवकांना चांगल्या गोष्टींसाठी प्रोत्साहित करणे माझे वैयक्तिक उद्दीष्ट आहे. समाजातील गुन्हेगारी कमी करण्यासाठी याही बाजूने विचार करणे आवश्यक आहे. येथील युवकांनी गुन्हेगारी टोळीचा सदस्य होण्याऐवजी शिक्षणात लक्ष द्यावे, असे आवाहन यवतमाळचे नवनियुक्त अपर जिल्हा पोलीस अधीक्षक (आयपीएस) नुरुल हसन यांनी ‘लोकमत’शी बोलताना केले.

ठळक मुद्देनुरुल हसन : युवकांना चांगल्यासाठी प्रोत्साहित करणे वैयक्तिक उद्दिष्ट, बदल घडविण्याचा प्रयत्न करणार

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : यवतमाळातील युवकांना चांगल्या गोष्टींसाठी प्रोत्साहित करणे माझे वैयक्तिक उद्दीष्ट आहे. समाजातील गुन्हेगारी कमी करण्यासाठी याही बाजूने विचार करणे आवश्यक आहे. येथील युवकांनी गुन्हेगारी टोळीचा सदस्य होण्याऐवजी शिक्षणात लक्ष द्यावे, असे आवाहन यवतमाळचे नवनियुक्त अपर जिल्हा पोलीस अधीक्षक (आयपीएस) नुरुल हसन यांनी ‘लोकमत’शी बोलताना केले.प्रतिकूल परिस्थितीतून स्वत:ची ओळख निर्माण करण्यासाठी प्रचंड मेहनतीची आवश्यकता असते. मीसुद्धा २०१५ च्या बॅचचा आयपीएस आहे. मात्र इथवरचा माझा प्रवास अनेकांना प्रेरणा देणारा ठरू शकतो. चतुर्थ श्रेणी कर्मचारी असलेल्या कुटुंबात जन्म झाला. झोपडपट्टीमध्ये कच्चे घर होते. या परिसरात दूरदूरपर्यंत शिक्षणासाठी अनुकूल असे कुठलेच वातावरण उपलब्ध नव्हते. अशाही स्थितीत आपली वाट निवडत कठोर परिश्रमाने बी.टेक इलेक्ट्रीकल्सची पदवी प्राप्त केली. त्यानंतर एका मल्टीनॅशनल कंपनीत नोकरी सुरू केली. मात्र ते अंतिम ध्येय नसल्याने अभ्यास सुरु होता. त्यानंतर भाभा अ‍ॅटोमिक रिसर्च सेंटरमध्ये शास्त्रज्ञ म्हणून काम करण्याची संधी मिळाली. चार वर्षे येथे काम करताना सोबतच आयपीएसची तयारी सुरू केली. वयाच्या २८ व्या वर्षी (२०१५ मध्ये) आयपीएस झालो. तेव्हापासून समाजातील प्रत्येक युवकात बदल घडविण्यासाठी प्रयत्नरत असल्याचे अपर जिल्हा पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांनी सांगितले. युपीएससी, एमपीएससी व इतर स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या मुलांसाठी मदत व मार्गदर्शनासाठी नेहमीच तयार असल्याचेही हसन यांनी सांगितले.जिल्ह्याकडून खूप काही शिकायचे आहेयवतमाळ जिल्हा भौगोलिक दृष्ट्या मोठा आहे. येथून खूप साºया गोष्टी शिकायच्या आहेत. जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राज कुमार यांच्या मार्गदर्शनात काम करायचे आहे. त्यांनी ठरवून दिलेल्या दिशेने काम करत येथे कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवायची आहे. सध्या तरी जिल्ह्यातील समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय. प्रलंबित गुन्हे तत्काळ निकाली काढण्यासाठी, पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये शिस्त वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. शिवाय समाजात सशक्त पोलिसींग दिसली पाहिजे याकरिता एसपींच्या मार्गदर्शनात काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :Policeपोलिस