शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

अॅपवर झटपट दाखला, किती जणांकडे आहे 'महा ई ग्राम'?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2024 17:59 IST

नागरिकांसाठी सुविधा : ग्रामविकास व पंचायत राज विभागाचा उपक्रम

लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : नागरिकांना घरबसल्या ऑनलाइन पद्धतीने जास्तीत जास्त सुविधा देण्याकडे शासनाचा कल आहे. आता ग्रामपंचायतमधील सर्व दाखले घरबसल्या मिळणार आहे. ग्रामविकास व पंचायत राज विभागाने महा ई ग्राम उपक्रम हाती घेतला आहे. यात सर्व दाखले, प्रमाणपत्र मिळणार आहे. त्यासाठी नागरिकांना महा ई ग्राम अॅप्लिकेशन डाऊनलोड करावे लागणार आहे.

पूर्वी केवळ जमिनीचा सातबारा उतारा ऑनलाइन पद्धतीने काढला जात होता. मात्र, मोबाइल अॅप्लिकेशनच्या माध्यमातून जागेचा उतारा, ग्रामपंचायतीत मिळणारे जन्म, मृत्यू प्रमाणपत्र यांसारखे अनेक दाखले मिळणार आहे. ग्रामपंचायत सदस्यांची माहिती, आपण यापूर्वी केलेल्या कराचा भरणा, ही माहिती अॅपच्या माध्यमातून मिळणार आहे. ग्रामविकास विभाग व पंचायत राज विभागाने महा ई ग्राम सिटिझन कनेक्ट नावाचा अॅप लॉन्च केला आहे. हा अॅप मोबाइलमध्ये इन्स्टॉल करून नागरिक घरबसल्या ग्रामपंचायतीमधून मिळणारे दाखले काढू शकतात. 

यामुळे त्यांच्या वेळेत बचत होणार असून, कुणा मागे फिरावे लागणार नाही. मात्र, महा ई ग्रामची अजूनही म्हणावी तशी जनजागृती करण्यात आली नाही. नागरिकांनाही महा ई ग्रामबाबत फार काही माहीत नाही. ज्यांना माहीत आहे त्यांनी अॅप इन्टॉल केले आहे. 

वेळेची होणार बचत महा ई ग्राम सिटिझन कनेक्ट अॅप्लिकेशन अॅप मोबाइलमध्ये इन्स्टॉल केल्यास घरबसल्या ग्रामपंचायतमधून मिळणारे दाखले काढता येणार आहे. यामुळे नागरिकांच्या वेळेत बचत होणार असून, दाखल्यासाठी ग्रामपंचायतीत चकरा माराव्या लागणार नाहीत. मात्र यासंदर्भात ग्रामीण भागातील नागरिकांत म्हणावी तितकी जनजागृती नाही.

मालमत्ता कर भरा अॅपवर मालमत्ता कराचा भरणा करावयाचा असल्यास नागरिक थेट ग्रामपंचायतीत जातात. आपण जातो नेमके त्याच वेळी कर्मचारी राहत नाही. यामुळे नागरिकांना असुविधेचा सामना करावा लागतो. मालमत्ता कर अॅपवर भरता येणार असल्याने मोठी सुविधा निर्माण झाली आहे.

कोणते दाखले मिळतात?महा ई ग्रामच्या माध्यमातून नागरिकांना घरबसल्या जन्म व मृत्यू प्रमाणपत्र, नमुना आठ, विवाह नोंदणी दाखला, घरपट्टी, पाणीपट्टी कर आदी दाखले मिळण्याची सुविधा आहे.

महा ई ग्राम अॅप डाऊनलोड कसे कराल?आपल्या मोबाइलमधील प्ले स्टोअरमधून महा ई ग्राम सिटिझन कनेक्ट अॅप हे इन्स्टॉल करा. अॅप ओपन करून रजिस्टर करा. त्यामध्ये आपले नाव, जन्मतारीख, मोबाइल क्रमांक, ई मेल आयडीसह सर्व माहिती जतन करा. प्रमाणपत्र, दाखले मिळविण्यासाठी ऑनलाइन अर्ज करून प्रमाणपत्र मिळवता येईल.

टॅग्स :Yavatmalयवतमाळ