शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

पोफळणीत ज्ञानरचनावादाचे रोल मॉडेल

By admin | Updated: April 24, 2017 00:08 IST

दुर्गम भागातील शाळांचा शैक्षणिक दर्जा सुधारणे प्रशासनासाठी डोकेदुखी ठरले आहे.

दोन हजार शिक्षकांच्या भेटी : कल्पकतेने टाकाऊ वस्तूपासून साकारले साहित्य यवतमाळ : दुर्गम भागातील शाळांचा शैक्षणिक दर्जा सुधारणे प्रशासनासाठी डोकेदुखी ठरले आहे. अशाही प्रतिकूल परिस्थितीत कळंब तालुक्याच्या पोफळणी कोलाम पोडावर असलेल्या जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांनी कल्पकतेने संपूर्ण शाळाचा ज्ञानरचनावादाची ‘रोल मॉडेल’ बनविली आहे. या दोन शिक्षकी शाळेला राज्यभरातील तब्बल दोन हजारांवर शिक्षकांनी भेटी दिल्या आहेत. प्रत्येकाचा रिमार्क हा ‘एक्सलन्ट’ असाच आहे. पोफळणी शाळेची पटसंख्या ३५ इतकी आहे. कोलाम पोड असल्याने विद्यार्थ्यांना शाळेव्यतिरिक्त दुसरीकडे कुठेच शैक्षणिक वातावरण मिळत नाही. त्यामुळे परपंरागत शैक्षणिक पध्दतीत विद्यार्थ्यांचे मन लागत नव्हते. शिक्षकांनाही मुलांमध्ये रूची निर्माण करण्यात अनेक अडचणी येत होत्या. मुख्याध्यापक वसंत शेळके आणि सहायक शिक्षण राजेश उरकुडे यांनी ज्ञानरचनावाद पध्दतीतबाबत ऐकले. ही पध्दत काय चा अभ्यास केला. मात्र त्यांच्यापुढे साहित्य खरेदीची समस्या निर्माण झाली. या शिक्षकांनी साहित्य खरेदीच्या खर्चाचा भार उचलून मिळेल त्या टाकावू वस्तूपासून शैक्षणिक साहित्य सारकारले. त्याचा परिणाम म्हणून ही शाळा आता बिना फळ््याची व खडूची झाली आहे. येथे छडीचीही गरज पडत नाही. मुलांचा संपूर्ण वेळ खेळत खेळत अध्ययनात जातो. या शाळेतील पहिल्या, दुसऱ्या वर्गातील विद्यार्थी कितीही मोठा भागाकार, गुणाकार, बेरीज, वजाबाकी काही क्षणात करून दाखवितात. ज्ञानरचनावादाच्या साहित्यामुळे भाषा, गणित, भूमितीय पध्दती अगदी सोप्या प्रकारे मुलांनी आत्मसात केल्या आहेत. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून शिक्षक या शाळेला भेटी देण्यासाठी येतात. आतापर्यंत तब्बल दोन हजारांवर शिक्षकांनी शाळेला भेट दिली. त्यानंतर त्यांनी दिलेला अभिप्राय अतिशय बोलका आहे. अमरावती जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यातील उर्दू शाळेचे सहायक शिक्षक शहजाद अहमद, चांदूर रेल्वे येथील शाळा सीध्दी निर्धारक विवेक राऊत, मेटीखेड्याचे केंद्र प्रमुख सिध्दार्थ बन्सोड यांनी या शाळेला भेट देऊन दोन्ही शिक्षकांच्या कार्याची भरभरून प्रशंशा केली आहे. ही शाळा रोल मॉडेल असली तरी, शिक्षण विभाग अथवा प्रशासनाकडून शिक्षकांच्या पाठीवर साधी कौतुकाची थाप मिळाली नाही. यावरून शिक्षण विभाग किती सजग आहे हे दिसून येते. (कार्यालय प्रतिनिधी)