शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

अमरावतीच्या दिव्यांग शिक्षकांची यवतमाळात तपासणी, बदल्यांमध्ये घेतला लाभ

By अविनाश साबापुरे | Updated: May 4, 2023 18:02 IST

जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदल्यांची प्रक्रिया होऊन एक महिना लोटला आहे. आता हे शिक्षक कार्यमुक्ती आदेश मिळविण्यासाठी धडपडत आहे.

यवतमाळ : जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदल्यांची प्रक्रिया होऊन एक महिना लोटला आहे. आता हे शिक्षक कार्यमुक्ती आदेश मिळविण्यासाठी धडपडत आहे. मात्र त्यात अनेकांनी बोगस दिव्यांग प्रमाणपत्र सादर केल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे अमरावती जिल्ह्यातील संबंधित दिव्यांग शिक्षकांची यवतमाळच्या वैद्यकीय महाविद्यालयाकडून तपासणी केली जाणार आहे. बदली प्रक्रियेमध्ये सूट मिळविण्यासाठी किंवा प्राधान्याने पसंतीचे गाव मिळविण्यासाठी अनेक शिक्षकांनी संवर्ग-१ मधून अर्ज भरला. त्यात प्रामुख्याने दिव्यांग शिक्षकांचा समावेश आहे. अमरावती जिल्ह्यात अनेक शिक्षकांनी बोगस दिव्यांग प्रमाणपत्र सादर केल्याच्या तक्रारी जिल्हा परिषदेकडे तसेच विभागीय आयुक्तांकडेही दाखल झाल्या आहे.

आता ग्रामविकास विभागाने बदली झालेल्या शिक्षकांना १५ मेपूर्वी कार्यमुक्त करण्याचे निर्देश दिले आहे. मात्र तत्पूर्वी शिक्षकांनी अपंगत्वाची खोटी प्रमाणपत्रे तर सादर केली नाही ना, याची तपासणी केली जाणार आहे. त्यामुळे अमरावतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविशांत पंडा यांनी यवतमाळ येथील मेडिकलमधून शिक्षकांना तपासणी करवून घेण्याचे निर्देश दिले आहे. त्यासंदर्भात त्यांनी वसंतराव नाईक वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधीक्षकांनाही तपासणी करून देण्याबाबत पत्र पाठविले आहे. शिक्षक बदली प्रक्रियेत वैद्यकीय प्रमाणपत्राच्या आधारे लाभ घेतलेल्या शिक्षकांची किंवा त्यांच्या जोडीदारांची तपासणी करण्यात येणार आहे. या तपासणीत संबंधिताचे प्रमाणपत्र किंवा त्याचे अपंगत्व खोटे आढळल्यास बदली प्रक्रियेतून बाद केले जाणार आहे. 

यवतमाळच्या शिक्षकांचे काय?

दरम्यान, यवतमाळ जिल्ह्यातही संवर्ग-१ मधून जवळपास एक हजार शिक्षकांनी बदलीचे अर्ज भरले आहे. त्यांच्या बदल्याही झाल्या आहे. येथेही काही शिक्षकांनी बोगस दिव्यांग प्रमाणपत्र सादर केल्याच्या तक्रारी आहेत. अमरावतीप्रमाणे यवतमाळच्या शिक्षकांचीही तपासणी होणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. 

आंतरजिल्हा बदलीत फार कमी दिव्यांग शिक्षक आहेत. जिल्हांतर्गत बदल्यांमध्ये दिव्यांग शिक्षक आहेत. सर्वांच्याच कागदपत्रांची तपासणी केली जाते. परंतु, बदल्यांची प्रक्रिया ऑनलाइन असल्याने आपल्या स्तरावर फार काही नसते. दिव्यांग शिक्षकांच्या आकडेवारीची माहिती घेऊन पुढील निर्णय घेण्यात येईल.- डाॅ. श्रीकृष्ण पांचाळ, सीईओ, यवतमाळ

आपल्याकडे आंतरजिल्हा बदली झालेल्या उर्वरित १२७ शिक्षकांना लवकरच कार्यमुक्त केले जाईल. त्यातील काहींनी नकार दिला आहे. मात्र तो नकार मान्य करावा की करू नये याबाबत निर्णय घेण्याचा सर्वस्वी अधिकार सीईओंना आहे. अमरावतीप्रमाणे आपल्याकडे जिल्हांतर्गत बदलीमधील दिव्यांग शिक्षकांची तपासणी करण्याबाबत अद्याप तरी वरिष्ठांचे निर्देश नाही. - किशोर पागोरे, शिक्षणाधिकारी, यवतमाळ