शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

महानिरीक्षकांच्या पथकाची तीन महिन्यांपासून चौकशी सुरुच !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2020 05:00 IST

कथित सीए हरीश चव्हाण (भांडेगाव ता. दारव्हा) यांची ३५ लाख रुपयांनी फसवणूक करण्यात आली होती. यातील आरोपी संजय साबने याला कर्नाटकाच्या बेळगावातून अटक करण्यात आली. मात्र त्याचा पीसीआर न घेता लगेच सोडता यावे व प्रकरणाची तडजोड व्हावी यासाठी सहायक पोलीस निरीक्षक गोरख चौधर यांनी साबने याच्या नातेवाईकांकडून एक कोटी रुपयांची वसुली केली होती.

ठळक मुद्देपारवा ठाणेदारप्रकरण : एक कोटींचे ‘वाटेकरी’ गुलदस्त्यातच

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : पारवा ठाणेदार गोरख चौधर यांच्या एक कोटींच्या अवैध वसुली प्रकरणात पोलीस महानिरीक्षकांनी चौकशीचे आदेश दिले होते. परंतु गेल्या तीन महिन्यांपासून ही चौकशी सुरूच असल्याने या पथकाकडे साशंकतेने पाहिले जात आहे. चौकशीला एवढे दिवस लागण्यामागे नेमके कारण काय, प्रकरण गंभीर आहे की, राजकीय दबावातून टाईमपास केला जात आहे, याची चर्चा होताना दिसते.कथित सीए हरीश चव्हाण (भांडेगाव ता. दारव्हा) यांची ३५ लाख रुपयांनी फसवणूक करण्यात आली होती. यातील आरोपी संजय साबने याला कर्नाटकाच्या बेळगावातून अटक करण्यात आली. मात्र त्याचा पीसीआर न घेता लगेच सोडता यावे व प्रकरणाची तडजोड व्हावी यासाठी सहायक पोलीस निरीक्षक गोरख चौधर यांनी साबने याच्या नातेवाईकांकडून एक कोटी रुपयांची वसुली केली होती. ‘लोकमत’ने या प्रकरणाचा भंडाफोड केला. तेव्हा हे प्रकरण बनावट नोटा, नोटा दुप्पट करणे आणि बोगस पदव्यांचे असल्याचे निष्पन्न झाले. अवधूतवाडी पोलीस ठाण्यात असताना चौधर यांनी हा एक कोटींचा कारनामा केला होता. एक कोटींच्या या प्रकरणात अनेक जण ‘वाटेकरी’ आहेत. जिल्हास्तरावर चौधर प्रकरणात कारवाई होणार नाही याची खात्री पटल्याने अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक मकरंद रानडे यांनी ६ मार्च रोजी या प्रकरणाच्या सखोल चौकशीचे आदेश दिले. ही चौकशी आपले वाचक उपअधीक्षक गिरीष बोबडे यांच्याकडे सोपविण्यात आली. बोबडे यांनी लगेच चौकशीला प्रारंभही केला होता. या प्रकरणात दोन्ही पक्ष समोर नसतानाही केवळ जादा पैशासाठी नोटरी करून देणाऱ्या वकिलाच्या घरावरही चौकशी पथकाने धडक दिली होती. दोन लाख रुपये अ‍ॅडव्हॉन्स देऊन बारावी सीबीएसईची गुणपत्रिका मिळविणाऱ्या पांढरकवड्यातील राजकीय पदाधिकाºयाचीही या पथकाने चौकशी केली.एपीआय गोरख चौधरचे कारनामे सुरूचचौकशीचा अहवालच न आल्याने एक कोटींच्या या वसुलीतील ‘वाटेकरी’ नेमके कोण कोण ही बाब गुलदस्त्यात आहे. पोलीस प्रशासनही महानिरीक्षकांच्या चौकशी अहवालाच्या प्रतीक्षेचा आढावा घेऊन चौधर यांच्यावर कारवाई करणे टाळत आहे. प्रशासनाचे अप्रत्यक्ष अभय मिळत असल्याने तिकडे पारवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत गोरख चौधर यांचे कारनामे सुरूच आहेत. त्यांचे एक प्रकरण न्यायालयात गेले आहे. सोने देण्याच्या नावाने दहा लाखांची फसवणूक झाल्याचे प्रकरणही गाजते आहे.चौकशी अचानक मंदावली कशी ?सुरुवातीला चौकशीने वेग घेतला असताना गेल्या तीन महिन्यांपासून मात्र ही चौकशी थांबली आहे. यामागील रहस्य गुलदस्त्यात आहे. चौधर यांनी बारामतीतून राष्ट्रवादी काँग्रेसमार्फत पोलीस प्रशासनाकडे ‘लिंक’ लावली होती. कदाचित त्यातून तर चौकशीची गती मंदावली नाही ना, अशी शंकाही पोलीस दलात व्यक्त केली जात आहे.

टॅग्स :PoliceपोलिसPolice Stationपोलीस ठाणे