शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

विहिरीतील गाळ उपसून गुरुदेव युवा संघाने केला प्रशासनाचा अभिनव निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2018 23:38 IST

शहराला तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत असताना उपाययोजना प्रस्तावावरच अडकल्या आहे.

ऑनलाईन लोकमतयवतमाळ : शहराला तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत असताना उपाययोजना प्रस्तावावरच अडकल्या आहे. विहिरीतील गाळ उपसून त्या उपयोगात आणण्यासाठी तयार करण्यात आलेला प्रस्ताव नगर विकास अधिकाऱ्यांनी दुर्लक्षित केला. या बाबीचा निषेध नोंदवित, काळे झेंडे दाखवून गुरुदेव युवा संघाने सार्वजनिक विहिरीतील गाळ उपसणे सुरू केले. येथील जुनी धर्मशाळा परिसरातील विहिरीवरून याची सुरुवात करण्यात आली.शहरातील सार्वजनिक विहिरीतील गाळाचा उपसा, ब्लिचिंग पावडर टाकून पाण्याचे शुद्धीकरण, सबमर्सिबल पंप बसवून पाणीप्रश्न निवारणासाठी गुरुदेव युवा संघाने वारंवार निवेदन दिले. दरम्यान, नगरपरिषद पाणीपुरवठा विभागाने तसा प्रस्ताव तयार करून नगर विकास अधिकाºयांकडे पाठविला. याची दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे जेसीबी लाऊन गुरुदेव युवा सेवा मंडळाने गाळाचा उपसा सुरू केला.गुरुदेव युवा संघाचे अध्यक्ष मनोज गेडाम यांच्या नेतृत्त्वात सार्वजनिक विहिरीजवळ निदर्शने करण्यात आली. याचा प्रशासनावर काहीही फरक न झाल्याने काळे झेंडे दाखवून प्रशासनाचा निषेध करत सार्वजनिक विहिरींच्या साफसफाईचे काम सुरू करण्यात आले. यावेळी मनोज गेडाम यांच्यासह सचिव हिम्मतराव मुंदेकर, कोषाध्यक्ष प्रकाश कडुकार, अशोक माहुरकर, लक्ष्मण पोहकार, सुभाष जगताप, श्रीकृष्ण काठगळे, पंजाबराव देशमुख, संजय शेटे आदी उपस्थित होते. दरम्यान, मनोज गेडाम यांनी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांची भेट घेऊन यवतमाळ शहरातील पाणी उपलब्ध असलेल्या ५० ते ६० सार्वजनिक विहिरींची यादी सादर केली. नेहरू उद्यान, शिवाजी उद्यान, सत्यनारायण ले-आऊट, पोबारू ले-आऊट या भागातील विहिरीवरून पाण्याचे टँकर भरले जात होते. आता हे स्रोतही आटले आहे. त्यामुळे गाळाने भरलेल्या विहिरी उपसून शहरवासीयांची तहान भागविणे गरजेचे आहे, असे गेडाम यांनी सांगितले.