शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

नव्या राष्ट्रीय महामार्गात अमरावती-यवतमाळवर अन्याय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 27, 2018 11:20 IST

मेळघाट-करंजी हा ३१५ किलोमीटरचा नवा राष्ट्रीय महामार्ग मंजुरीच्या वाटेवर असला तरी यात अमरावती-यवतमाळच्या प्रवासावर अन्याय होणार आहे. कारण एवढाच मार्ग दुपदरी असून उर्वरित सर्व मार्ग चौपदरी आहे.

ठळक मुद्देमार्ग केवळ दुपदरी मेळघाट ते करंजी मंजुरीच्या वाटेवरदोन हजार कोटींचे बजेट३१५ किलोमीटरची लांबी

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : मेळघाट-करंजी हा ३१५ किलोमीटरचा नवा राष्ट्रीय महामार्ग मंजुरीच्या वाटेवर असला तरी यात अमरावती-यवतमाळच्या प्रवासावर अन्याय होणार आहे. कारण एवढाच मार्ग दुपदरी असून उर्वरित सर्व मार्ग चौपदरी आहे. त्यामुळेच अमरावती-यवतमाळ हा मार्गसुद्धा चौपदरी करण्याची जोरदार मागणी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे होत आहे.मेळघाटातील हा राष्ट्रीय महामार्ग मध्यप्रदेश सीमेपासून सुरू होणार आहे. परतवाडा-आसेगाव-अमरावती-नांदगाव खंडेश्वर-नेर-यवतमाळ-करंजी पर्यंत राहणार आहे. या रस्त्याच्या माध्यमातून अमरावती-यवतमाळ हे जिल्हे आणखी वेगानरीत्या जोडले जाणार आहेत. मध्यप्रदेशातील वाहनांना तेलंगणा-आंध्रप्रदेश तसेच मराठवाड्यात जाण्यासाठी हा मार्ग उपयोगी ठरणार आहे.यामुळे राष्ट्रीय महामार्ग क्र. ७ वर ‘कनेक्टीव्हीटी’ निर्माण होणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या महामार्गासाठी काम सुरू आहे. आता हा महामार्ग दिल्लीत मंजुरीच्या वाटेवर असल्याची माहिती आहे.

कुठे चौपदरी, कुठे दुपदरी३१५ किलोमीटर लांबी असलेल्या या महामार्गाचे बजेट सुमारे दोन हजार कोटी रुपयांचे राहणार आहे. अमरावती ते परतवाडा आणि यवतमाळ ते करंजी (ता. पांढरकवडा जि. यवतमाळ) हा मार्ग चौपदरी तर अमरावती ते यवतमाळ हा दोन पदरी राहणार आहे.या दोन पदरी रस्त्यासाठी प्रवासी वाहतूक कमी असणे हे कारण सांगितले जात आहे. प्रत्यक्षात राष्ट्रीय महामार्ग झाल्यानंतर या संपूर्ण मार्गावरच वाहतूक वाढणार एवढे निश्चित. मग अमरावती-यवतमाळ एवढाच रस्ता दुपदरी का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. या दुपदरी मार्गामुळेच चौपदरी राष्ट्रीय महामार्गाचा उद्देश सफल होणार नाही, असे मानले जाते.कारण या दुपदरी मार्गावर वाहनांची गती पुन्हा मंदावणार आहे. म्हणूनच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने मेळघाटपासून करंजीपर्यंत सरसकट संपूर्ण महामार्गच चौपदरी करावा, अशी जोरदार मागणी केली जात आहे.

सहा ठिकाणी बायपासधारणी, परतवाडा, आसेगाव पूर्णा, अमरावती, नेर, यवतमाळ येथे या महामार्गावर बायपास राहणार आहे. बायपास संपणाऱ्या प्रत्येक ठिकाणी छोटा पूल राहणार आहे.

नांदगाव खंडेश्वरला उड्डाण पूलनांदगाव खंडेश्वर येथे उड्डाण पूल तर अमरावती-परतवाडा रोडवरील पेढी नदी येथे नवा पूल बांधला जाणार आहे. कारण तेथील पूल हा ११० वर्षे जुना आहे. पोलीस ठाण्याच्या मागील बाजूने हा बायपास व पूल राहणार असल्याचे सांगितले जाते. नेरमध्ये अमरावतीवरून यवतमाळकडे येताना डाव्या बाजूने बायपास राहणार आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याचा हा नियोजित बायपास आहे. दिल्लीतून या राष्ट्रीय महामार्गाला मंजुरी मिळताच भूसंपादन प्रक्रिया हाती घेतली जाणार आहे.

राजकीय नेत्यांची प्रतिष्ठा पणालादुपदरी मार्गाच्या या प्रकरणात अमरावती व यवतमाळ जिल्ह्यातील मंत्री, खासदार, आमदार व राजकीय नेत्यांनी जातीने लक्ष घालण्याची गरज निर्माण झाली आहे. या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

टॅग्स :National Highway No. 6राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6