लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शहरातील तारपुरा येथे मुराब व यादव कुटुंबात सशस्त्र झडप झाली. या वादात मुराब कुटुंबातील सूर्यप्रकाश रमाकांत मुराब तर यादव कुटुंबातील नीलेश अनिल यादव हे दोघे गंभीर जखमी झाले. यातील सूर्यप्रकाश मुराब याचा गुरुवारी सायंकाळी उपचारादरम्यान शासकीय रुग्णालयात मृत्यू झाला. त्यामुळे या प्रकरणाला खुनाचे वळण मिळाले आहे.परस्परांविरुद्ध दिलेल्या तक्रारीवरून अवधूतवाडी पोलिसांनी सुरुवातीला प्राणघातक हल्ल्याचा गुन्हा दाखल केला. यात यादव गटातील राजकुमार उर्फ बाबा श्यामराव पवार (३२) याला अटक केली. तर मुराब परिवारातील तातू रमाकांत मुराब, आकाश, गगण या तिघांना अटक केली. गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक सुयोग महापुरे करीत आहे. अटकेतील चारही आरोपींना गुरुवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने १६ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. आता या प्राणघातक हल्ल्याचा गुन्हा खुनामध्ये परावर्तित झाला आहे. यादव कुटुंबासह सहा जणांवर खुनाचा गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया अवधूतवाडी ठाण्यात सुरू होती. मुराब व यादव हे दोन्ही कुटुंब अगदीच शेजारी राहतात. शेजारच्या कुरबुरीवरून या परिवारांमध्ये वाद होता. हाच वाद विकोपाला गेल्याने सूर्यकांत मुराब याचा मृत्यू झाला. आणखी या प्रकरणाला मोठे वळण लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
तारपुरा हल्ल्यातील जखमीचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2020 05:01 IST
परस्परांविरुद्ध दिलेल्या तक्रारीवरून अवधूतवाडी पोलिसांनी सुरुवातीला प्राणघातक हल्ल्याचा गुन्हा दाखल केला. यात यादव गटातील राजकुमार उर्फ बाबा श्यामराव पवार (३२) याला अटक केली. तर मुराब परिवारातील तातू रमाकांत मुराब, आकाश, गगण या तिघांना अटक केली.
तारपुरा हल्ल्यातील जखमीचा मृत्यू
ठळक मुद्देमृत सूर्यप्रकाश मुराब : गुन्हेगारी वर्तुळात हलचल, खुनाचा गुन्हा दाखल होणार