शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

कलावंतांसाठी प्रत्येक जिल्ह्यात सभागृह हवे, विजय दर्डा यांची सूचना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2018 03:19 IST

साहित्यिक, कलावंतांचा खरा सन्मान करायचा असेल, तर सरकारने प्रत्येक जिल्हास्तरावर त्यांना सभागृह बांधून द्यावे, अशी सूचना लोकमत एडिटोरिअल बोर्डचे चेअरमन, माजी खासदार विजय दर्डा यांनी येथे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यापुढे मांडली.

वणी (यवतमाळ) : साहित्यिक, कलावंतांचा खरा सन्मान करायचा असेल, तर सरकारने प्रत्येक जिल्हास्तरावर त्यांना सभागृह बांधून द्यावे, अशी सूचना लोकमत एडिटोरिअल बोर्डचे चेअरमन, माजी खासदार विजय दर्डा यांनी येथे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यापुढे मांडली. त्यावर केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरींनीही सकारात्मक प्रतिसाद देत जातीने लक्ष घालणार असल्याचे आश्वासन दिले.साहित्यिक व्यासपीठावर एकत्र आलेल्या दोन राजकीय धुरिणांनी रविवारी रसिकांच्या मनातली इच्छा पूर्ण केली. प्रसंग होता विदर्भ साहित्य संमेलनाच्या समारोपाचा. माजी खासदार विजय दर्डा यांनी साहित्यिकांच्या मनातला मुद्दा मांडला. ते म्हणाले, देशाचे चारित्र्य हे लेखक, कलावंतांच्या सन्मानावर अवलंबून असते. ज्या देशात लेखक, कलावंतांचा सन्मान होतो, तो देश प्रगत ठरतो. परंतु, ग्रामीण भागातील कलावंतांना त्यांच्या आविष्कारासाठी व्यासपीठ मिळत नाही. मोठ्या शहरांमध्ये व्यासपीठे असली तरी ती महागडी आहेत. तेवढा पैसा खर्च करण्याची कलावंतांची ऐपत नसते. शासनाने ही बाब लक्षात घेऊन राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात कलावंत, लेखकांना सभागृह उपलब्ध करून द्यावे. अशा सभागृहांचे दरही कमी ठेवावेत. तेव्हाच कलावंतांना आपली कला सहज सादर करता येईल, असे मत दर्डा यांनी व्यक्त केले. गडकरी म्हणाले, यासंदर्भात मी स्वत: लक्ष घालीन. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशीही चर्चा करणार आहे. कलावंत व लेखक समाजाला दिशा देतात. त्यांचा सन्मान झालाच पाहिजे, यावर उभयतांनी आपल्या भाषणांमधून प्रकाश टाकला. कलावंतांच्या सभागृहासाठी हा सकारात्मक प्रतिसाद पाहून रसिकांनी टाळ्यांचा कडकडाट केला.

टॅग्स :Vijay Dardaविजय दर्डाNitin Gadakriनितिन गडकरी