शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

यवतमाळात स्वतंत्र विदर्भाचा झेंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2018 01:19 IST

महाराष्ट्र दिनी वेगळ्या विदर्भाचा झेंडा फडकवून विदर्भ राज्य आघाडीने सरकारच्या विरोधात आंदोलनाचा बिगुल फुंकला. जिल्ह्यातील ६० ग्रामपंचायतींनी वेगळया विदर्भाचा ठराव घेतला. विदर्भवाद्यांनी महाराष्ट्र दिनावर बहिष्कार टाकून वेगळया विदर्भाच्या मागणीसाठी शहरात ठिकठिकाणी आंदोलन केले.

ठळक मुद्देनेताजी चौकात उपोषण : प्रतिष्ठाने बंद करून सरकारचा निषेध

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : महाराष्ट्र दिनी वेगळ्या विदर्भाचा झेंडा फडकवून विदर्भ राज्य आघाडीने सरकारच्या विरोधात आंदोलनाचा बिगुल फुंकला. जिल्ह्यातील ६० ग्रामपंचायतींनी वेगळया विदर्भाचा ठराव घेतला. विदर्भवाद्यांनी महाराष्ट्र दिनावर बहिष्कार टाकून वेगळया विदर्भाच्या मागणीसाठी शहरात ठिकठिकाणी आंदोलन केले. सरकारच्या धोरणाचा निषेध नोंदविला.स्थानिक नगरभवन परिसरातील लोकनायक बापूजी अणे यांच्या पुतळयाजवळ विदर्भवाद्यांनी आंदोलन केले. विदर्भ राज्य आघाडीच्या नेतृत्वात स्वतंत्र विदर्भाचा ध्वज फडकविण्यात आला.यावेळी विदर्भ आघाडीचे सचिव अ‍ॅड. अमोल बोरखडे, जिल्हाध्यक्ष प्रमोद डफळे, अ‍ॅड. चंद्रकांत तिजारे, विदर्भ आंदोलन समितीचे दत्तात्रय चांदोरे, अस्थाई कामगार संघटनेचे विनोद झेंडे, अजगरभाई, जसवंत चिंडाले, किशोर मेश्राम, विजय निवल, किशोर परडखे, एस.जी. राऊत, रामदास सव्वालाखे, शरद उमक, प्रवीण भोयर, ज्ञानेश्वर बोरखडे आदी उपस्थित होते.स्थानिक नेताजी चौकात विदर्भ संग्राम समिती, विदर्भ युवा संग्राम समिती आणि अन्याय निवारण समितीच्या नेतृत्वात व्यापारी प्रतिष्ठाने बंद ठेवून सरकारच्या धोरणाचा निषेध करण्यात आला. १ मे हा दिवस काळा दिवस म्हणून पाळण्यात आला. विदर्भ वाद्यांनी उपोषण केले. नेताजी चौकात दिवसभर धरणे देण्यात आले. यावेळी माजी आमदार विजयाताई धोटे, अन्याय निवारण समितीच्या सचिव क्रांती धोटे, विदर्भ युवा संग्राम समिती अध्यक्ष लालजी राऊत, शेख जाकीर, गणेश कोसरकर, वैशाली पवार, डॉ. मुकुंद दंदे, डॉ. गणेश नाईक, कृष्णा परिपगार, ममता काळे आदी उपस्थित होते.

 

टॅग्स :Vidarbhaविदर्भ