शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात आता उर्दू शाळांसाठी स्वतंत्र शिक्षण वारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2018 11:50 IST

गेल्या दोन वर्षांपासून राज्यात यशस्वीपणे आयोजित करण्यात येत असलेल्या शिक्षणाच्या वारीत उर्दू शाळांनी सक्रिय सहभाग नोंदविला आहे. त्याची दखल घेत यंदा खास उर्दू माध्यमांच्या शाळांसाठी राज्यस्तरावर स्वतंत्र शिक्षणाची वारी भरविली जाणार आहे.

ठळक मुद्देलिंक ओपन राज्यभरातील उर्दू शिक्षकांना संधी

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : गेल्या दोन वर्षांपासून राज्यात यशस्वीपणे आयोजित करण्यात येत असलेल्या शिक्षणाच्या वारीत उर्दू शाळांनी सक्रिय सहभाग नोंदविला आहे. त्याची दखल घेत यंदा खास उर्दू माध्यमांच्या शाळांसाठी राज्यस्तरावर स्वतंत्र शिक्षणाची वारी भरविली जाणार आहे.गेल्या दोन वर्षांत शिक्षणाच्या राज्यस्तरीय वारीचे तीन वेळा आयोजन करण्यात आले. पहिल्या वर्षी केवळ पुण्यात आयोजन झाल्याने अनेकांना सहभाग घेता आला नाही. त्यामुळे दुसऱ्या वर्षी नागपूर, अमरावतीसह औरंगाबाद अशा ठिकाणी वारी भरविण्यात आली. तर तिसऱ्या वेळी नागपूर, अमरावती, लातूर आणि रत्नागिरी अशा चार शहरांमध्ये वारी आयोजित करून हजारो शिक्षकांना संधी देण्यात आली.विशेष म्हणजे, या प्रत्येक वारीमध्ये राज्यातील उर्दू माध्यमाच्या शिक्षकांनी वेगवेगळे प्रयोग सादर केले. परंतु, निकषांचा विचार करता हे स्टॉल पाहण्यासाठी उर्दू माध्यमाच्या शिक्षकांना फार कमी संधी मिळाली. त्याची दखल घेत अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघाने राज्य शासनाकडे पाठपुरावा केला.उर्दू शाळांसाठी स्वतंत्र शिक्षणाची वारी घेण्याचा आग्रह धरला होता. त्यावरून शिक्षण विभागाच्या सहसचिव डॉ. सुवर्णा खरात यांनी पुण्याच्या विद्या प्राधिकरणाला याबाबत ८ फेब्रुवारीला निर्देश दिले. त्यानुसार, उर्दू शिक्षकांना वारीत सहभाग घेण्यासाठी प्राधिकरणाने ‘लिंक’ ओपन केली असून आॅनलाईन नोंदणीही सुरू केली आहे.

औरंगाबादकडे यजमानपदउर्दू माध्यमाच्या शाळांची स्वतंत्र राज्यस्तरीय शिक्षणाची वारी आयोजित करण्यासाठी औरंगाबाद शहराची निवड करण्यात आली आहे. वारीचे यजमानपद सोलापूरला देण्याचाही विचार झाला होता. मात्र प्राधिकरणाने औरंगाबादची निवड केली असून मार्च महिन्याच्या प्रारंभी उर्दू शिक्षणाची वारी आयोजित केली जाणार आहे.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्र