शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

नेरमध्ये चिकनगुण्यासदृश आजाराच्या रुग्णात वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2020 05:00 IST

गेली काही दिवसांपासून या प्रकारच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. शासकीय रुग्णालयामध्ये उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत असल्याचे आरोग्य विभागाच्या सूत्रांकडून सांगितले गेले. बाह्यरुग्ण विभागात तपासणीसाठी येणाऱ्यांपैकी ५० टक्के रुग्णांमध्ये चिकनगुण्यासदृश आजाराची लक्षणे दिसून येत असल्याचे सांगितले जाते.

ठळक मुद्देप्रशासनामध्ये चिंता : खरबी गावात आढळले २५ रुग्ण, रुग्णालयात गर्दी

लोकमत न्यूज नेटवर्कनेर : कोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरू असतानाच तालुक्यात चिकनगुण्यासदृश आजाराने कहर केला आहे. खरबी या गावात तर तब्बल २५ जणांना अशा प्रकारचा आजार झाला आहे. रुग्णांना चक्क हातावर उचलून रुग्णालयात न्यावे लागत आहे.हातपाय दुखणे, बोटांना वेदना, चालता न येणे अशा प्रकारची लक्षणे असलेले रुग्ण झपाट्याने वाढत आहे. ही लक्षणे प्रामुख्याने चिकनगुण्या या आजारात आढळून येतात. त्यामुळे लोकांमध्ये मोठी भीती निर्माण झाली आहे.गेली काही दिवसांपासून या प्रकारच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. शासकीय रुग्णालयामध्ये उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत असल्याचे आरोग्य विभागाच्या सूत्रांकडून सांगितले गेले. बाह्यरुग्ण विभागात तपासणीसाठी येणाऱ्यांपैकी ५० टक्के रुग्णांमध्ये चिकनगुण्यासदृश आजाराची लक्षणे दिसून येत असल्याचे सांगितले जाते.सततच्या पावसामुळे जागोजागी पाणी साचले आहे. त्यात डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. संबंधित यंत्रणेकडून यावर उपाययोजना केली जात नाही. याचा परिणाम लोकांच्या आरोग्यावर होत आहे. अनेकजण घरीच उपचार घेत असल्याची माहिती आहे. त्रास वाढल्यानंतरच रुग्णालयाची वाट धरली जात आहे.खरबी या गावातील अतुल दैवत, बंटी राठोड, विजय राठोड, हिरासिंग राठोड, वनिता राठोड, गणेश आडे, रोहिदास राठोड, विमल मातने, ऋतिक राठोड, नभीबाई चव्हाण, कमला राठोड, वसंत राठोड, अक्षय राठोड यांच्यामध्ये चिकनगुण्यासदृश आजाराची लक्षणे दिसून आली आहे. एकाच गावात एवढ्या मोठ्या संख्येने अशा प्रकारचे रुग्ण आढळून आल्याने आरोग्य यंत्रणेची चिंता वाढली आहे.रुग्णालयामध्ये चिकनगुण्यासदृश आजाराची लक्षणे असलेल्या रुग्णांची संख्या वाढली आहे. तपासणी अहवाल आल्यानंतरच या आजाराविषयी निश्चित सांगता येईल.- डॉ. प्रतीक खोडवे, अधीक्षक, शासकीय रुग्णालय, नेर

टॅग्स :Healthआरोग्य