शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

गुन्हेसिद्धी व शिक्षेचे प्रमाण वाढवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2018 21:24 IST

सत्र व प्रथमश्रेणी न्यायालयांमध्ये दाखल होणाऱ्या फौजदारी खटल्यात गुन्हे शाबितीचे व शिक्षेचे प्रमाण वाढविण्याच्या दृष्टीने पोलिसांच्या स्तरावरून प्रयत्न व्हावे, त्यासाठी तपासात कोणत्याही त्रुट्या राहणार नाही याची खबरदारी घ्या असे निर्देश जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राज कुमार यांनी जिल्हाभरातील ठाणेदारांना दिले आहेत.

ठळक मुद्देठाणेदारांना निर्देश : मुख्यमंत्री घेणार आढावा

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : सत्र व प्रथमश्रेणी न्यायालयांमध्ये दाखल होणाऱ्या फौजदारी खटल्यात गुन्हे शाबितीचे व शिक्षेचे प्रमाण वाढविण्याच्या दृष्टीने पोलिसांच्या स्तरावरून प्रयत्न व्हावे, त्यासाठी तपासात कोणत्याही त्रुट्या राहणार नाही याची खबरदारी घ्या असे निर्देश जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राज कुमार यांनी जिल्हाभरातील ठाणेदारांना दिले आहेत.एसपींची मासिक गुन्हे आढावा बैठक गुरुवारी येथे पार पडली. या बैठकीत अनेक विषयांवर चर्चा झाली. ३ ते ४ डिसेंबर दरम्यान राज्याचे गृहमंत्री तथा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जिल्ह्यात येणार आहे. यावेळी ते गुन्हेगारीचा आढावा घेणार आहे. ठाणेदारांच्या क्राईम मिटींगवर मुख्यमंत्र्यांच्या या संभाव्य दौºयाचे सावट दिसून आले. न्यायालयांमध्ये दाखल होणाºया खटल्यात गुन्हे शाबिती व शिक्षेचे प्रमाण वाढावे यासाठी मुख्यमंत्री नेहमीच आग्रही असतात. तोच धागा पकडून एसपींनी सर्व ठाणेदारांना गुन्ह्यांचा तपास काटेकोर करण्याचे निर्देश दिले. आजच्या घडीला जिल्ह्यात न्यायालयीन खटल्यात गुन्हे शाबितीचे प्रमाण वाढले असले तरी ते समाधानकारक नाही. हे प्रमाण किमान ५० टक्क्यापर्यंत वाढविण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली. त्यासाठी सदोष दोषारोपपत्र न्यायालयात सादर होणार नाही याची काळजी घेण्याच्या सूचना ठाणेदारांना करण्यात आल्या. पोलीस महानिरीक्षकांचे वार्षिक निरीक्षण सुरू होणार आहे. या अनुषंगाने प्रलंबित गुन्हे वेगाने निकाली काढण्याचे निर्देश देण्यात आले. आगामी लोकसभा निवडणुका लक्षात घेता रेकॉर्डवरील संबंधित गुन्हेगारांवर वॉच ठेवण्याच्या व प्रतिबंधात्मक कारवाई करण्याच्या सूचना करण्यात आल्या. निवडणूक काळात गोंधळ घालणाºया, मतदान केंद्रांवर वादग्रस्त वर्तवणूक असलेल्या व कायदा व सुव्यवस्थेला आव्हान देणाऱ्या रेकॉर्डवरील गुन्हेगारांची स्वतंत्र यादी तयार करण्याचे निर्देश ठाणेदारांना देण्यात आले आहे. तडीपारीचे प्रस्ताव तातडीने निकाली काढण्याचे निर्देश जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी अलिकडेच उपविभागीय दंडाधिकाऱ्यांना दिले आहेत. मोक्का, एमपीडीए वाढवा अशा सूचना दिल्या गेल्या आहेत.नवी इमारत तयारडिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात होऊ घातलेल्या मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यादरम्यान जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या आवारातील विस्तारीत इमारतीचे उद्घाटनही करण्याचे एसपींचे नियोजन आहे.

टॅग्स :Policeपोलिस