शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

एसटीच्या यवतमाळ विभागाची उत्पन्नाची बाजू होतेय कमकुवत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2021 05:00 IST

उत्पन्न नसल्याने एसटीला मागील मार्च महिन्यापासून मोठ्या आर्थिक प्रश्नाला तोंड द्यावे लागले. अलीकडे काही महिन्यांत ही बाजू सुधारत असतानाच नियोजनाचा बोजवारा उडाला आहे. बस स्थानकाच्या अगदी समोरून अवैध प्रवासी वाहतुकीची वाहने एसटीचे प्रवासी ओढून नेत आहेत. सकाळच्या वेळी इतर खासगी वाहनांचीही या ठिकाणी गर्दी होते. २०० मीटरच्या आतच ही वाहने उभी करून बस स्थानकातून प्रवासी घेऊन जातात. यावर कुणाचेही नियंत्रण नाही.

ठळक मुद्देकर्मचाऱ्यांमधील सूर : ठोस उपाययोजना हव्या, बसेस धावतात रिकाम्या

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या यवतमाळ विभागातील उत्पन्नाची बाजू कमकुवत होत असल्याचा कर्मचाऱ्यांचा सूर आहे. बसफेऱ्यांचे चुकत असलेले नियोजन, प्रवाशांचा खासगी वाहनांकडे वाढत चाललेला कल, अधिकाऱ्यांचे होत असलेले दुर्लक्ष आदी बाबी याला कारणीभूत असल्याचे सांगितले जाते. राहात असलेल्या त्रुटी निदर्शनास आणून दिल्यानंतरही त्या दूर करण्याचा प्रयत्न केला जात नसल्याची ओरड होत आहे. अनेक मार्गांवरील बसफेऱ्या अक्षरश: दोन ते चार प्रवासी घेऊन धावतात. प्रत्येक पाच मिनिटांनंतर प्रामुख्याने अमरावती, नागपूर मार्गावर बसेस सोडल्या जातात. स्थानिकसह बाहेर आगाराच्या बसेसचीही त्यामध्ये भर पडते. याच बसफेऱ्या काही अंतराने सोडल्यास प्रवाशांच्या सोयीचे होईल. शिवाय महामंडळाला अधिक प्रवासी मिळून उत्पन्नात भर पडेल. सकाळी प्रवासी संख्या कमी असते. अशावेळी थोड्या अंतराने बसेस सोडणे अपेक्षित आहे. उत्पन्न नसल्याने एसटीला मागील मार्च महिन्यापासून मोठ्या आर्थिक प्रश्नाला तोंड द्यावे लागले. अलीकडे काही महिन्यांत ही बाजू सुधारत असतानाच नियोजनाचा बोजवारा उडाला आहे. बस स्थानकाच्या अगदी समोरून अवैध प्रवासी वाहतुकीची वाहने एसटीचे प्रवासी ओढून नेत आहेत. सकाळच्या वेळी इतर खासगी वाहनांचीही या ठिकाणी गर्दी होते. २०० मीटरच्या आतच ही वाहने उभी करून बस स्थानकातून प्रवासी घेऊन जातात. यावर कुणाचेही नियंत्रण नाही. जिल्ह्यातील जवळपास आगारांमध्ये अशीच काहिशी परिस्थिती आहे. उत्पन्न वाढविण्यासाठी मध्यवर्ती कार्यालयाकडून वेळोवेळी दिल्या जाणाऱ्या सूचनांचे पालनही अपवादानेच होते. प्रवाशांना सुखकर आणि सुरक्षित प्रवास करता यावा, यासाठी सुचविलेल्या उपाययोजना केल्या जात नाहीत. बसची योग्य स्वच्छता होत नाही, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घालून देण्यात आलेल्या नियमांचे पालनही केले जात नाही. एसटी बसेस शॅम्पू, सोड्याने धुण्याचा घेण्यात आलेला निर्णयही यवतमाळ विभागात गुंडाळून ठेवण्यात आला आहे. आगार प्रमुखांनी या सर्व बाबींवर लक्ष केंद्रित करून त्या करून घेण्याची अपेक्षा आहे. यातील काही अधिकारी गंभीर नसल्याची ओरड होत आहे.

अखेर ‘त्या’ फेरीला एक पैसाही उत्पन्न नाहीयवतमाळ आगारातील जितेंद्र पाटील या वाहकाने एसटीचे उत्पन्न कमी होण्यामागील स्वानुभव तक्रारीद्वारे विभाग नियंत्रकांकडे मांडले. १५ फेब्रुवारी रोजी त्यांना बरीच घासाघीस झाल्यानंतर अमरावती मुक्कामी कामगिरी मिळाली. यासाठी अडीच ते तीन तास उशिराने बस मिळाली. त्या वेळी ७० ते ८० प्रवासी या बसला मिळाले. अवघ्या काही मिनिटांत बस सुटणार होती. तेवढ्यातच पाटील यांना बाभूळगावपर्यंत जाण्याचा आदेश देण्यात आला. आता बस सुटण्यास विलंब होईल, असे वाटल्याने अमरावती बसमधील प्रवासी उतरून गेले. पाटील यांना यवतमाळ-बाभूळगाव बसचे उत्पन्न केवळ १२० रुपये मिळाले. बाभूळगावहून यवतमाळ येताना शून्य उत्पन्न झाले. यात महामंडळाचे आठ ते नऊ हजार रुपयांचे नुकसान झाले. जाणीवपूर्वक कामगिरी बदलविण्याचा संबंधित अधिकाऱ्याने केलेला प्रकार यामुळे महामंडळाचे नुकसान होण्यासोबतच जनमाणसात एसटीची प्रतिमा मलीन झाली. यामुळे संबंधित दोषींवर कारवाई करावी, अशी विनंती त्यांनी विभाग नियंत्रकांकडे केली आहे.

 

टॅग्स :state transportएसटी