शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

अवकाळी पावसाने शहरात गारठा अन् शिवारात फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2018 23:45 IST

ढगाळी वातावरण आणि सलग दोन दिवस झालेल्या अवकाळी पावसाने शहरवासीयांना प्रचंड गारठ्याचा अनुभव येत आहे. त्याचवेळी शेतशिवारात मात्र हाताशी आलेल्या पिकांना फटका बसला आहे.

ठळक मुद्देसलग दुसऱ्या दिवशीही पाऊस : कपाशी, तुरीचे मोठे नुकसान

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : ढगाळी वातावरण आणि सलग दोन दिवस झालेल्या अवकाळी पावसाने शहरवासीयांना प्रचंड गारठ्याचा अनुभव येत आहे. त्याचवेळी शेतशिवारात मात्र हाताशी आलेल्या पिकांना फटका बसला आहे. फुटलेला कापूस पऱ्हाटीवरच भिजला, तर तुरीचा फुलोरा गळून मातीमोल झाला. आता या नुकसानीची पाहणी करण्यासाठी कृषी विभागाची यंत्रणा गावपातळीवर पोहोचली आहे.शनिवारी सायंकाळी जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली. तर रविवारी सकाळी अल्पशा सरी बरसल्या. त्यानंतर रात्री जोरदार पाऊस झाला.हवामानात अचानक झालेल्या बदलाने बाष्प घेवून निघालेले वारे जिल्ह्यात सक्रिय झाले आहे. १३ डिसेंबरपर्यंत जिल्ह्यात पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. यानंतर थंडीची लाट पसरण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. अवेळी बरसणारा हा पाऊस शेतकऱ्यांसाठी चिंतेची बाब ठरला.जिल्ह्यात कपाशीचे क्षेत्र निम्म्यावर आहे. पाच लाख हेक्टरवर कापसाची लागवड झाली आहे. हा कापूस वेचणीला आला आहे. मात्र मजूर न मिळाल्याने शेतशिवार पांढरेशुभ्र आहे. अवकाळी पावसाने या पिकावर पाणी फेरले आहे.घाटंजी, पांढरकवडा, दारव्हा, कळंबमध्ये बरसलागत ४८ तासात यवतमाळात सर्वाधिक १८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. जिल्ह्यात १० तालुक्यांमध्ये पावसाने हजेरी लावली. इतर ठिकाणी कमी अधिक प्रमाणात पाऊस पडल्याने सरासरी २.६७ मिलिमीटर पावसाची नोंद पर्जन्यमापक यंत्रणेने केली आहे. बाभूळगावमध्ये ३ मिमी, कळंब २.३३ मिमी, दारव्हा ३ मिमी, केळापूर ३ मिमी, घाटंजी ४ मिमी, राळेगाव २ मिमी, वणी ३ मिमी, मारेगाव २.४० मिमी, झरी २ मिमी पावसाची नोंद करण्यात आली.

टॅग्स :Rainपाऊस