शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

कुस्त्यांच्या दंगलीचे उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2017 01:42 IST

स्वातंत्र संग्राम सेनानी जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या स्मृतीदिनानिमित्त जिल्हा कुस्तीगिर संघातर्फे येथील ऐतिहासिक हनुमान आखाड्यात आयोजित काटा कुस्त्यांच्या विराट दंगलीचे .....

ठळक मुद्देजवाहरलाल दर्डा स्मृती आयोजन : उद्घाटनीय कुस्तीत शंकर पहेलवान विजयी

ऑनलाईन लोकमत यवतमाळ : स्वातंत्र संग्राम सेनानी जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या स्मृतीदिनानिमित्त जिल्हा कुस्तीगिर संघातर्फे येथील ऐतिहासिक हनुमान आखाड्यात आयोजित काटा कुस्त्यांच्या विराट दंगलीचे माजी आमदार कीर्ती गांधी यांच्या हस्ते कुस्त्यांचे जोड लावून उद्घाटन करण्यात आले. शंकर धोत्रे यवतमाळ व मोहनप्रकाश आंबडकर आकोट या दोन पहेलवानांदरम्यान झालेल्या उद्घाटनीय कुस्तीत शंकर पहेलवानाने बाजी मारली.शनिवारी दुपारी १२.३० वाजता हलगी, तुतारी व डफाच्या निनादात कुस्त्यांच्या दंगलीचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी जिल्हा कुस्तीगिर संघाचे अध्यक्ष बाळासाहेब मांगुळकर, सचिव अनिल पांडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रवींद्र ढोक, रमेश भिसनकर, प्रताप पारसकर, काशीनाथ ब्राम्हणे, दीपक ठाकूर, रामेश्वर यादव, सुरेश लोहाणा, प्रवीण पोटे, विजय डांगे आदी उपस्थित होते. १० लाख रुपयांची जंगी लयलूट असलेल्या या कुस्त्यांच्या दंगलीत देशभरातील नामवंत मल्लांनी सहभाग नोंदविला आहे.दिल्ली, भिलाई, हरियाणा, मुंबई, कोल्हापूर, सांगली, पुणे, हिंगोली, अमरावती, औरंगाबाद, नांदेड, पुसद, वाशीम, अकोला व ग्रामीण भागातील ५०० ते ५५० मल्लांनी या दंगलीत भाग घेतला. दिल्ली येथील आसीफ पहेलवान, हरिंदर पहेलवान, योगेश पहेलवान, पुणे येथील मोसीन सौदागर, तुषार डोबे, सुहास घोडगे, जमीर पहेलवान, कोल्हापूरचा श्रीपती कर्नाळ हे पहेलवान प्रेक्षकांच्या आकर्षणाचे केंद्र ठरले. उद्घाटनीय कुस्तीनंतर १००, २००, ३००, ४०० व ५०० रुपये बक्षीस असलेल्या कुस्त्यांचे जोड लावण्यात आले. सायंकाळी ७.३० वाजतापासून प्रतिष्ठेच्या १२ क्रमांकापर्यंतच्या कुस्त्यांना सुरूवात झाली होती. पंच म्हणून उद्धव बाकडे, महंमद शकील, सुरेश जयसिंगपूरे यांनी काम पाहिले. कुस्त्यांचे जोड लावण्याची जबाबदारी गजानन जाधव, गजानन उजवणे, आनंद जाधव, धनराज मिसाळे, नामदेव काळे, संदीप नेवारे, सुभाष जुमळे, पवन पांडे यांनी पार पाडली.विजय दर्डा यांनी लावली कुस्तीकाटा कुस्तीच्या विराट दंगलीला दुपारी ३.३० वाजता लोकमत मीडिया प्रा.लि.च्या एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन विजय दर्डा, लोकमत जिल्हा कार्यालय प्रमुख किशोर दर्डा यांनी भेट दिली. जिल्हा कुस्तीगिर संघाच्यावतीने त्यांचे स्मृतीचिन्ह देऊन स्वागत करण्यात आले. नंतर विजय दर्डा यांच्या हस्ते राजू किनाके व तानबाजी शेटे पहेलवान यांची कुस्ती लावण्यात आली. यात राजू किनाके विजयी ठरले.