लोकमत न्यूज नेटवर्कमहागाव : समाजाला अजूनही चांगल्या विचाराची गरज असून नव्या पिढीला धम्म सांगताना हजारो वर्षांचा तोच तो विचार सांगण्यापेक्षा काहीतरी सकारात्मक विचार त्यांना देण्याची गरज असल्याचे प्रतिपादन नांदेड-वघाळाच्या महापौर शिलाताई किशोर भवरे यांनी केले.येथील कृषी उत्पन्न बाजार समिती प्रांगणात शनिवारी बौद्ध ऐक्य परिषदेचे उद्घाटन करताना त्या बोलत होत्या. त्या म्हणाल्या, आपण शिकले पाहिजे. सोबतच चांगले संस्कार आत्मसात केले पाहिजे. तरच आपण धम्माचे सार्थक करू. भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे स्वप्न साकार करण्यासाठी स्पर्धा परीक्षेची कास धरून समाजाला सत्तेच्या माध्यमातून परिवर्तनाच्या दिशेला नेण्याचे आवाहन त्यांनी केले. गोकुळ वंजारे यांच्या अध्यक्षतेखाली, नालंदा भरणे, किशोर भवरे, अंबादास भगत, प्रा.दीपक वाघमारे, प्रकाश मनवर, सतीश खाडे यांच्या उपस्थितीत परिषदेचे उद्घाटन झाले.शनिवारी सकाळी पहिल्या सत्रापूर्वी भन्ते धम्मसेवकजी यांच्याहस्ते धम्म ध्वजारोहण आणि बुद्ध वंदना घेण्यात आली. याप्रसंगी समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. बौद्ध ऐक्य परिषदेचा रविवार १४ जानोरीला समारोप होणार आहे. या परिषदेसाठी जिल्ह्यासह महाराष्ट्रातील समाजबांधव येथे दाखल झाले आहे.
महागावात बौद्ध ऐक्य परिषदेचे उद्घाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2018 22:15 IST
समाजाला अजूनही चांगल्या विचाराची गरज असून नव्या पिढीला धम्म सांगताना हजारो वर्षांचा तोच तो विचार सांगण्यापेक्षा काहीतरी सकारात्मक विचार त्यांना देण्याची गरज असल्याचे प्रतिपादन नांदेड-वघाळाच्या महापौर शिलाताई किशोर भवरे यांनी केले.
महागावात बौद्ध ऐक्य परिषदेचे उद्घाटन
ठळक मुद्देशीलाताई भवरे : समाजाला चांगल्या विचारांची गरज