शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

‘बिरसा पर्व’चे आदिवासी संस्कृतीद्वारे उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2019 06:00 IST

आदिवासी संस्कृतीचा ध्वज फडकवून आणि गोंडी गोगो पूजा करून येथील समता मैदानात आयोजित ‘बिरसा पर्व-२०१९’चे उद्घाटन शनिवारी सकाळी झाले. यानिमित्त विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा घेण्यात आली. मार्ग परिवहन महामंडळातील चालक महिला कर्मचाऱ्यांचा यावेळी गुणगौरव करण्यात आला. प्रसंगी मान्यवरांनी विविध विषयांवर मार्गदर्शन केले.

ठळक मुद्देविद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा । एसटीतील महिला चालकांचा सत्कार, विविध विषयांवर मार्गदर्शन

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : आदिवासी संस्कृतीचा ध्वज फडकवून आणि गोंडी गोगो पूजा करून येथील समता मैदानात आयोजित ‘बिरसा पर्व-२०१९’चे उद्घाटन शनिवारी सकाळी झाले. यानिमित्त विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा घेण्यात आली. मार्ग परिवहन महामंडळातील चालक महिला कर्मचाऱ्यांचा यावेळी गुणगौरव करण्यात आला. प्रसंगी मान्यवरांनी विविध विषयांवर मार्गदर्शन केले.बिरसा पर्व उत्सव समितीच्यावतीने २८ व २९ डिसेंबर रोजी ‘बिरसा पर्व’ आयोजित करण्यात आले आहे. उद्घाटन अशोकभाई चौधरी (गुजरात) यांच्या हस्ते झाले. माजी आदिवासी विकासमंत्री आमदार प्राचार्य डॉ. अशोक उईके अध्यक्षस्थानी होते. प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना नेते संतोष ढवळे, नगरसेवक जावेद अन्सारी, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य मिलिंद धुर्वे, अनुसूचित जाती जमाती परिसंघाचे जिल्हाध्यक्ष एम.के. कोडापे आदी उपस्थित होते.सामाजिक ऋण फेडण्यासाठी समाजाने तयार राहिले पाहिजे, असे प्रतिपादन अशोकभाई चौधरी यांनी आपल्या उद्घाटनपर भाषणात केले. यावेळी बाबाराव मडावी, विठोबाजी मसराम, प्रा. माधव सरकुंडे, डॉ. विनोद डवले, राजेश ढगे, कैलास कोळवते यांचा सत्कार करण्यात आला.राजू चांदेकर यांनी प्रास्ताविकातून समाजाच्या समस्या मांडल्या. आदिवासी विकास महामंडळाच्या संचालक मीनाक्षीताई वट्टी यांच्या अध्यक्षतेखाली दुसरे सत्र पार पडले. यावेळी प्रमुख वक्त्या म्हणून गोंडवाना गणतंत्र पार्टीच्या विदर्भ महासचिव सुवर्णा वरखडे लाभल्या होत्या. अखिल भारतीय संविधानिक हक्क परिषदेच्या राज्याध्यक्ष मनीषा तिरणकार, सुनंदाताई मडावी, सुनीता काळे यांची यावेळी प्रामुख्याने उपस्थिती होती.या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी किशोर उईके, कृष्णा पुसनाके, सुरेश मडावी, अजय उईके, पवन आत्राम, दिलीप शेडमाके, राजू केराम, अभिमन्यू धुर्वे आदी पुढाकार घेत आहेत.आजचे कार्यक्रमबिरसा पर्वात रविवार, २९ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता पहिले सत्र सुरू होईल. यावेळी ‘आदिवासींची अवस्था विकासाची, चिंतन व दिशा’ या विषयावर मार्गदर्शन होईल.दुपारी ३ वाजता दुसऱ्या सत्रात ‘२०२१ च्या जनगणनेत आदिवासी समुदायांनी धर्माच्या रकान्यात काय नोंदवावे?’ या विषयावर मान्यवरांकडून मार्गदर्शन केले जाणार आहे.

टॅग्स :state transportएसटी