शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

झरी तालुक्यात दूधच नाही, तर खवा येतो कुठून?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2024 17:23 IST

Yavatmal : भेसळयुक्त पदार्थामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम

लोकमत न्यूज नेटवर्क मुकुटबन : सणवार आले की, भेसळीचा धंदा तेजीमध्ये येतो. त्यामुळे सामान्य नागरिकांचे आरोग्य धोक्यात येते. सामान्य नागरिक बिनधास्तपणे गोड पदार्थ खरेदी करतात आणि सण साजरे करतात; परंतु भेसळयुक्त पदार्थामुळे त्यांच्या आरोग्यावर परिणाम होतो, याची त्यांना कल्पना नसते. अन्न सुरक्षा व कायदा २००६ नियमन अन्वये कारवाई करण्यात यावी तसेच दूध, खव्यापासून बनविलेली मिठाई, पनीर, स्वीट, तूप, बटर व नमकीनचे नमुने तपासण्यात यावेत, अशी मागणी होत आहे.

सणाला गोड पदार्थांचीच सर्वत्र रेलचेल असते; परंतु गोड पदार्थ तयार करण्यासाठी जे दूध, खवा, मावा लागतो, त्याचे उत्पादन नेहमीप्रमाणेच असते. मग अचानक सणावाराला मागणीच्या तुलनेत पुरवठा कसा होणार? त्यामुळे मग भेसळ करून माल वाढविण्यात येतो. परिणामी तालुकावासीयांच्या आरोग्याचे तीन तेरा वाजले असून अन्न व औषध प्रशासनाचे दुर्लक्ष असल्यामुळे सणासुदीच्या काळात भेसळीचा धंदा जोरात सुरू आहे. एकीकडे दूध मिळणे कठीण झाले आहे. मग हे व्यावसायिक दुधापेक्षा कमी किमतीच्या पावडरचा वापर करून कृत्रिमरीत्या खवा बनवून त्यापासून मिठाई बनवतात. ही मिठाई आरोग्यासाठी घातक असून व्यावसायिक कोणत्या पदार्थापासून आपले उत्पादन बनवून विक्री करतात, याकडेसुद्धा अन्न व औषध प्रशासन विभागाचे दुर्लक्ष होत आहे. अन्न व औषध प्रशासन या विभागामार्फत कोणत्याही प्रकारची तपासणीच होतच नसल्याचे वास्तव आहे. 

आदिलाबाद, पांढरकवडातून येते पाकिटाचे दूधझरी तालुक्यात दुधाची कमतरता असून मुबलक प्रमाणात गावरानी दूध मिळतच नाही. आदिलाबाद, पांढरकवडा व वणी येथून पाकीटमध्ये विविध कंपन्यांचे दूध झरी व मुकुटबनला येते. मुकुटबनला कोणत्याही हॉटेलात संध्याकाळी पाच वाजतानंतर दुधाचा चहा मिळत नाही. तसेच कोणत्याही हॉटेलात किवा स्वीट मार्टमध्ये कढईत दूध आटवून दुधापासून खवा, मावा बनवताना दिसून येत नाही. तरीपण येथे खव्यापासून बनवलेल्या अनेक मिठाईची खुलेआम विक्री होत आहे. याकडे अन्न व औषध प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी आहे.

टॅग्स :Yavatmalयवतमाळ