शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांचे शाळेतील ‘पहिले पाऊल’ मजबूत करण्यासाठी गुरुजींना धडे

By अविनाश साबापुरे | Updated: April 13, 2024 18:35 IST

तालुकास्तरीय प्रशिक्षण : ३८० शाळांमध्ये पूर्वतयारी मेळाव्याचे नियोजन, शिक्षणाधिकारी देणार भेटी

यवतमाळ : पहिलीत दाखल होणाऱ्या विद्यार्थ्यांची शाळेत येण्यापूर्वीच पायाभूत अभ्यासाची तयारी व्हावी, यासाठी प्रत्येक शाळेत ‘पहिले पाऊल’ अभियान राबविले जाणार आहे. ही पूर्वतयारी बालकांच्या मातांकडून कशी करुन घ्यावी याबाबत शनिवारी शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात आले. 

डायट तसेच पंचायत समिती शिक्षण विभागाच्या वतीने हे शाळापूर्व तयारी अभियानाचे तालुकास्तरीय प्रशिक्षण येथील अभ्यंकर कन्या शाळेत आयोजित करण्यात आले होते. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डाॅ. प्रशांत गावंडे, उपशिक्षणाधिकारी राजू मडावी यांची उपस्थिती होती. प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ अधिव्याख्याते डॉ. रमेश राऊत, अधिव्याख्याता मधुमती सांगळे, मुख्याध्यापिका मोहना गंगमवार, केंद्रप्रमुख सुदर्शन थोटे, तालुका समन्वयक शुभांगी वानखडे, सहतालुका समन्वयक दीपलक्ष्मी ठाकरे, राजहंस मेंढे यांची उपस्थिती होती. 

 शिक्षण हा प्रत्येक विद्यार्थ्याचा मुलभूत अधिकार आहे. तो विद्यार्थ्यांना प्राप्त करवून देणे हे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे. शिक्षकांनी आरटीई व एनईपी यामधील तरतुदींचा अभ्यास करणे गरजेचे आहे, असे आवाहन यावेळी मान्यवरांनी केले.  यवतमाळ तालुक्यात ३८० शाळांमध्ये १५ ते २० एप्रिल या कालावधीत शाळापूर्व तयारी मेळावा घेण्याचे नियोजन यावेळी करण्यात आले. शाळेत होणाऱ्या मेळाव्यांना शिक्षणाधिकारी भेटी देणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. बालकांच्या मातांना देण्यासाठी यावेळी उपक्रम कार्ड, आयडीया कार्ड, पहिले पाऊल पुस्तिका आदींबाबत शिक्षकांना माहिती देण्यात आली. गटशिक्षणाधिकारी पोपेश्वर भोयर यांच्या नियंत्रणात हे प्रशिक्षण पार पडले. प्रशिक्षण सत्राचे प्रास्ताविक शुभांगी वानखडे यांनी केले. सूत्रसंचालन वर्षा भुतनेर यांनी तर आभार दीपलक्ष्मी ठाकरे यांनी मानले.