शहरं
Join us  
Trending Stories
1
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
2
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
3
Jemimah Rodrigues Century : शाब्बास जेमी! घरच्या मैदानात अविस्मरणीय शतकी खेळीसह लुटली मैफील
4
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
5
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
6
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
7
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
8
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
9
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
10
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
11
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
12
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा
13
Bihar Election: नितीश कुमारी की, तेजस्वी यादव, बिहारमध्ये कोणाचे सरकार येणार? फलोदी सट्टा बाजाराचा कौल काय?
14
सुटकेचा थरार! ओलीस ठेवलेल्या मुलांना सोडवण्यासाठी पोलिसांचा गोळीबार; आरोपी रोहित आर्यचा मृत्यू
15
"माजी मंत्री दीपक केसरकर यांनी पवईतील किडनॅपरबाबत दिली अशी माहिती, म्हणाले, मी स्वत:…’’  
16
IND vs AUS : ऑस्ट्रेलिया ऑलआउट! पण फायनलसाठी टीम इंडियासमोर सेट केलं ३३९ धावांचं टार्गेट
17
Kawasaki: कावासाकी व्हर्सिस-एक्स ३०० भारतात लॉन्च; केटीएम, रॉयल एनफील्डच्या 'या' बाईकशी स्पर्धा!
18
मुंबईत अपहरणाचा थरार: पोलिसांची एकीकडे आरोपीशी चर्चा, दुसरीकडे बाथरूमच्या खिडकीतून एन्ट्री
19
UFO संशोधन की आणखी काही, अमेरिकेच्या हवाई दलाच्या तळावर तीन संशोधकांचा मृत्यू , कारण गूढच राहिले
20
मंदिरांच्या भिंतीवर आय लव्ह मोहम्मद लिहिणारे हिंदू तरुण, पोलिसांनी ठोकल्या बेड्या; नावे आली समोर

यवतमाळात बाळासाहेबांनी काढला पराभवाचा वचपा; दिग्रसमध्ये संजय राठोड पाचव्यांदा ठरले विजयी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2024 18:26 IST

Yavatmal Assembly Vidhan Sabha Election 2024 Results Winning Candidate : वणीमध्ये फडकला उद्धवसेनेचा भगवा झेंडा

विशाल सोनटक्के लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्ह्यातील सात विधानसभा मतदारसंघांत शनिवारी सकाळी ८:३० च्या सुमारास मतमोजणीला सुरुवात झाली. वणी मतदारसंघात संजय देरकर पहिल्या फेरीत एक हजार मतांनी पुढे होते. दिग्रसमध्ये माणिकराव ठाकरे ६३१ मतांनी आघाडीवर, आर्णी मतदारसंघात भाजपचे राजू तोडसाम अवघ्या ६२८ मतांनी आघाडीवर, तर यवतमाळ मतदारसंघात बाळासाहेब मांगूळकर यांना ८९५ मतांची आघाडी होती. त्यानंतर मतमोजणीच्या २५ ते ३० फेऱ्या पार पडल्या. प्रत्येक फेरीत नागरिकांची उत्कंठा वाढत होती. अखेर निकाल जाहीर झाल्यानंतर विजयी उमेदवारांनी एकच जल्लोष केला.

सन २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर जिल्ह्यात भाजपचे पाच, शिंदे शिवसेना एक आणि राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचा एक विधानसभा सदस्य होता. या निवडणुकीत महायुतीने दोन जागा गमावल्या आहेत. आता भाजपचे तीन विधानसभा सदस्य निवडून आले असून उद्धवसेना, शिवसेना, राष्ट्रवादी अजित पवार आणि काँग्रेसचा एक सदस्य निवडून आला आहे, अत्यंत अटीतटीच्या निवडणुकांत यवतमाळ विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे बाळासाहेब मांगूळकर ११ हजार ३८१ मतांनी निवडून आले. राळेगावमध्ये भाजपचे प्रा. अशोक उईके यांनी तिसऱ्यांदा निवडून हॅट्ट्रिक मिळविली. त्यांनी दोन हजार ८१२ मतांनी माजी मंत्री वसंत पुरके यांचा पराभव केला, वणीमध्ये उद्धवसेनेच्या संजय देरकर यांनी भाजप उमेदवार संजीवरेड्डी बोदकूरवार यांचा पराभव केला. आर्णी मतदारसंघामध्ये काँग्रेस उमेदवार जितेंद्र मोधे यांचा २९ हजार ३१३ मतांनी पराभव करून भाजपचे राजू तोडसाम विधानसभेत पोहोचले आहे. उमरखेड मतदारसंघात काँग्रेसच्या साहेबराव कांबळे यांनी चांगलीच वातावरण निर्मिती केली होती. मात्र भाजप उमेदवार किसन वानखेडे यांनी त्यांचा १६ हजार ६२९ मतांनी दणदणीत पराभव केला. येथे काँग्रेस बंडखोर विजय खडसे आणि भाजप बंडखोर राजेंद्र नजरधने या दोन्ही माजी आमदारांना मतदारांनी नाकारले. खडसे यांना अवधी दोन हजार ८८१, तर नजरधने यांना सात हजार ६१ मते मिळाली.

पुसद विधानसभा मतदारसंघात अत्यंत एकतर्फी निवडणूक झाली. राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे इंद्रनील नाईक १० हजार ७६९ मतांनी विजयी झाले. त्यांनी शरद पवार राष्ट्रवादी पक्षाचे शरद मैंद यांचा दारुण पराभव केला. नाईक हे सलग दुसऱ्यांदा विधानसभेत पोहोचले आहेत. दिग्रसमध्ये शिवसेना शिंदे पक्षाचे संजय राठोड यांनी सलग पाचव्यांदा विजयाचा झेंडा फडकविला. त्यांनी काँग्रेसचे दिग्गज नेते माजी मंत्री माणिकराव ठाकरे यांचा २८ हजार ७७५ मतांनी पराभव केला. निकाल जाहीर होताच विजयी उमेदवारांच्या समर्थकांनी जंगी मिरवणुका काढल्या.

माझा ऐतिहासिक विजय श्रद्धेय बाबूजींना समर्पित यवतमाळ विधानसभेच्या निवडणुकीत माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला मिळालेले यश हे श्रद्धेय बाबूजींना मी समर्पित करीत आहे. महाविकास आघाडीतील पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी दाखविलेल्या एकजूट आणि अविरत मेहनतीचे हे यश आहे. सर्वाच्या सहकाऱ्यामुळे आज काँग्रेसला हा विजय मिळविता आला. यवतमाळ मतदारसंघाच्या विकासासह सर्वसामान्यांचे मूलभूत प्रश्न सोडविण्यावर माझा भर असेल. प्रत्येक गावातील कार्यकर्ता या निवडणुकीत माझ्यासोबत राहिला.- बाळासाहेब मांगूळकर, काँग्रेस,  यवतमाळ 

विजयाची कारणे यवतमाळ शहरात रखडलेल्या विकासाच्या योजना, त्यात झालेला भ्रष्टाचार हा सत्ताधारी आमदारांच्या विरोधात सर्वात मोठा प्रचाराचा मुद्दा ठरला. यामुळे जनमताचा कौल विरोधात गेला. बेरोजगारीमुळे वाढलेली गुन्हेगारी आणि भययुक्त वातावरण हाही प्रश्न सत्ताधाऱ्यांच्या विरोधात गेला. नेमका यावरच विरोधकांनी प्रचार केंद्रित करून जनतेची साथ मिळविण्यात यश आले. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनीसुद्धा सत्ताधायांच्या विरोधात जनमताचा कौल दिला. इतर मतदारसंघात राज्य शासनाच्या लाडकी बहीण व इतर वैयक्तिक लाभाच्या योजनांचा प्रभाव दिसत होता. यवतमाळ विधानसभेत या योजनांपेक्षा स्थानिक प्रश्नांवर मतदार एकवटला.

सलग पाचव्या विजयामुळे वाढली जबाबदारी "दिग्रस विधानसभा मतदारसंघातील मतदारांनी दिलेले प्रेम आणि दाखविलेल्या विश्वासामुळेच मला सलग पाचव्यांदा या मतदारसंघातून विजय मिळविता आला, या विजयामुळे माझी जबाबदारी वाढली आहे. मतदारसंघातील जनतेसह माझ्यावर प्रेम करणाऱ्या तमाम नागरिकांना आणि महायुतीच्या कार्यकर्त्यांना तसेच शिवसैनिकांना हा विजय मी समर्पित करतो. मतदारसंघात अनेक विकासकामे सुरू आहेत. ही कामे पूर्ण करण्याला माझे प्राधान्य राहील, याबरोबरच दिलेली आश्वासनेही मी निश्चितपणे पूर्ण करेन."- संजय राठोड, शिवसेना शिंदे, दिग्रस 

विजयाची कारणे सलग दोन टर्म पालकमंत्री असलेल्या संजय राठोड यांनी मतदारसंघात कधीच दुर्लक्ष होऊ दिले नाही. सातत्याने प्रत्येक मतदाराच्या संपर्कात कसे राहता येईल, यावर त्यांनी भर दिला. याचाच फायदा या निवडणूक निकालात दिसून आला. ● निवडणूक प्रचाराच्या काळातही काँग्रेस उमेदवार मतदारसंघात मुक्कामी नव्हते. तसाही त्यांचा येथील संपर्क कमी होता. या वरच शिंदेसेनेचे उमेदवार संजय राठोड यांनी फोकस करीत प्रचार सुरू ठेवला. महाविकास आघाडीला प्रतिसाद मिळत असला तरी संजय राठोड यांची व्होट बँक कमी करता आली नाही. अपेक्षित मतांचे विभाजन झाले नाही. यामुळे ही निवडणूक चुरशीची वाटत असतानाच शेवटच्या टप्प्यात एकतर्फी झाली.

मतदारांच्या विश्वासाला सार्थ ठरवून दाखवेन "राज्यभरात महायुतीची लाट असताना वणी विधानसभा मतदारसंघातील सर्वसामान्य मतदारांनी माझ्यावर तसेच उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेवर जो विश्वास दाखविला आहे, या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. वणी मतदारसंघाच्या विकासासाठीची योजना माझ्याकडे आहे. ही विकासकामे पूर्णत्वास आणून मतदारसंघातील सर्वसामान्यांना दिलासा देण्याचा माझा प्रयल असेल. विधिमंडळात वणी मतदारसंघासाठी सातत्याने प्रश्न मांडून त्याची सोडवणूक करेन, याची मी ग्वाही देतो."- संजय देरकर, उद्धव सेना, वणी 

विजयाची कारणेवणी विधानसभा मतदारसंघात भाजपामध्ये अंतर्गत धुसफूस होती. त्यामुळे महायुतीला एकत्रितपणे जनमत आपल्या बाजूने वळविण्यात अपयश आले. उमेदवारीवरून सुरू झालेला वाद शेवटपर्यंत कायम होता. वणीत भाजपने उमेदवार देताना लोकसभेच्या निकालाकडे दुर्लक्ष केले. जातीय समीकरणात बसणारा उमेदवार डावलून जुन्याच उमेदवारावर डाव लावला होता. संजय देरकर यांच्या बाजूने सहानुभूतीची लाट तयार आली. महाविकास आघाडीत। बंड झाले तरी त्याचा फारसा परिणाम पडला नाही, नेत्यांनी बंड केले, कार्यकर्ते तन-मन-धनाने देरकर यांच्या पाठीशी राहिले. यातून हा विजय साकारला आहे.

टॅग्स :maharashtra assembly election 2024 resultमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024Yavatmalयवतमाळyavatmal-acयवतमाळpusad-acपुसदdigras-acदिग्रस