शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
3
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
4
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
5
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
6
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
7
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
8
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
9
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
10
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
11
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
12
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
13
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
14
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
15
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
16
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
17
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
18
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
19
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
20
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

यवतमाळमध्ये ७९ धोकादायक इमारतीत विद्यार्थी गिरवताहेत शिक्षणाचे धडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2024 18:51 IST

प्रशासन बेफिकीर : ४३५ शाळांना हवाय दुरुस्तीचा उपचार

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्हा परिषदेच्या शाळांचे जुने बांधकाम कालबाह्य झाल्याने इमारती जीर्ण झाल्या आहेत. त्या इमारती पाडून बांधकाम करणे आवश्यक झाले आहे; मात्र कोणत्या ना कोणत्या कारणाने बांधकामास अडथळा येत आहे. परिणामी ७९ जिल्हा परिषदेच्या शाळांतील विद्यार्थ्यांना धोकादायक इमारतीत अक्षरधडे गिरवावे लागत आहेत. पावसाळ्यात वादळवाऱ्यामुळे दुर्घटना घडल्यास जबाबदार कोण, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या दोन हजार १०३ शाळा आहेत. काही शाळांच्या इमारती तर ब्रिटिशकालीन आहेत. अनेक शाळांचे बांधकाम होऊन ३० ते ४० वर्षांचा कालावधी लोटला आहे. प्रशासनाने केलेल्या पाहणीत ७९ शाळांच्या इमारती पाडून त्याच ठिकाणी नव्याने बांधकाम करावे लागणार आहे. त्यासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी लागणार आहे. काही ठिकाणी तर पालक विद्यार्थ्यांना धोकादायक अशा शाळेत पाठविण्यासाठी तयार नाहीत. त्यामुळे अंगणवाडी, समाजमंदिरात शाळांचे वर्ग भरविले जात आहेत. तर, शाळेच्या वन्हांड्यात बसून शिक्षण घ्यावे लागत असल्याचे वास्तव आहे. 

२०२३-२४ मधील यू-डायसच्या माहितीनुसार तब्बल ४३५ शाळांवर दुरुस्तीचा उपचार करणे आवश्यक आहे; मात्र याकडेही प्रशासनाचे दुर्लक्ष होताना दिसते. नुकताच भंडारा जिल्ह्यात एका चिमुकलीचा शाळेत विजेचा धक्का लागल्याने मृत्यू झाला. या घटनेमुळे पालकांना पाल्यांच्या जिवाची जास्तच काळजी वाटू लागली आहे. जीर्ण झालेल्या शाळेतील इलेक्ट्रिक वायरिंगदेखील खिळखिळी झाली आहे. भंडारा येथील घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाने योग्य ते पाऊल उचलण्याची मागणी जोर धरत आहे.

कोणत्या तालुक्यात किती धोकादायक इमारती तालुका                    संख्यावणी                            २७पुसद                           २४झरी                             ०२महागाव                        ०१ घाटंजी                          ०१उमरखेड                      ११दिग्रस                          ०३आर्णी                           ०१मारेगाव                        ०१

प्रस्तावात निघाल्या त्रुटी७९ शाळांच्या इमारती पाहून नवीन बांधण्यासंदर्भातचा प्रस्ताव शिक्षण विभागाच्या समग्र शिक्षा अभियानामधून वित्त विभागाकडे पाठविला होता; मात्र त्यात त्रुटी निघाल्याने प्रस्ताव परत पाठविण्यात आला आहे.

"नवीन शाळा बांधकाम व शाळा दुरुस्तीसाठी लागणाऱ्याा निधीचा प्रस्ताव जिल्हा नियोजन समितीकडे पाठविण्यात येणार आहे. सदर प्रस्ताव तयार करण्याचे काम सुरू आहे"- प्रकाश मिश्रा, शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जि.प. यवतमाळ

नियोजनच्या निधीवरच मदार२०२४-२५ या वर्षासाठी वार्षिक योजनेच्या निधीमधूनच शाळा बांध- कामासाठी तरतूद करावी लागणार आहे. त्यासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी लागणार आहे. अजून नियोजनची सभा होऊ शकली नाही. बांधकामासाठी लागणाऱ्या निधीची मदार नियोजनवरच आहे. शाळा व्यवस्थापन समिती सदस्यांना लोकप्रतिनिधींकडे निधीसाठी आग्रह धरावा लागणार आहे.

तालुकानिहाय नादुरुस्त शाळा४३५ शाळांची दुरुस्ती करून त्या सुस्थितीत येऊ शकतात. आर्णी तालुक्यात दहा शाळा दुरुस्तीच्या प्रतीक्षेत आहेत. बाभूळगाव तालुक्यात १५, दारव्हा तालुक्यात २७, दिग्रस ११, घाटंजी ३४, कळंब ८, महागाव ५४, मारेगाव २०, नेर, १. पांढरकवडा २६. पुसद ४१. राळेगाव १५, उमरखेड ३३, वणी ४५, यवतमाळ ४३, झरी तालुक्यातील ४२ शाळांची दुरुस्ती प्रशासनाला करावी लागणार आहे.

टॅग्स :zp schoolजिल्हा परिषद शाळाYavatmalयवतमाळ