शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

कापूस निघण्यापूर्वीच व्यापारी शेतकऱ्यांच्या दारात; उत्पादनात घट व दरात तेजीची शक्यता

By रूपेश उत्तरवार | Updated: September 5, 2022 12:39 IST

खेडा खरेदी करणारे व्यापारी यासाठी आघाडीवर आहेत. त्यांनी कापूस उत्पादक शेतकऱ्यांचा पहिला वेचा मिळावा म्हणून ॲडव्हान्स बुकिंग केले आहे.

यवतमाळ : यावर्षी सर्वत्र कापसाचे उत्पादन घटण्याची शक्यता आहे. यामुळे येणाऱ्या हंगामात दर वाढण्याचा अंदाज आहे. हीच बाब ओळखून कमी दरात कापूस मिळावा म्हणून गावखेड्यात कापूस निघण्यापूर्वीच व्यापाऱ्यांकडून ॲडव्हान्स बुकिंग केले जात आहे.

मान्सूनपूर्व लागवडीतील कापसाचा वेचा बाजारात आला. गणेश चतुर्थीला जळगाव जिल्ह्यात कापसाच्या खरेदीचा शुभारंभ झाला. यादिवशी ११ हजार ते १६ हजार रुपये क्विंटल पर्यंतचे दर विविध बाजारपेठेत राहिले. विदर्भ आणि मराठवाड्यात कापूस बाजारपेठेत येण्यास अजून अवधी आहे. या दोन्ही प्रांतात कापसाची लागवड मोठ्या प्रमाणात आहे. अतिवृष्टीने पूरपरिस्थिती निर्माण झाली. यातून कापूस प्रांतात लाखो हेक्टर क्षेत्र नष्ट झाले.

यवतमाळ आणि वर्धा जिल्ह्यात हे क्षेत्र जवळपास तीन लाख हेक्टरच्या घरात आहे. इतर कापूस क्षेत्राला अती पावसाने फटका बसला आहे. पिकांची वाढ खुंटली आहे. नंतरच्या काळात उन्हाचा तडाखा अधिक राहिला. यातून कापसाची पातीगळ मोठ्या प्रमाणात झाली. यामुळे कापसाचे एकरी उत्पादनही घटणार, अशी स्थिती सर्वत्र आहे.

बाहेर देशातही उष्णतेची लाट आहे. यामुळे अमेरिका आणि चीनमध्ये कापसाचे उत्पादन घटणार आहे. सिंध प्रांतात आलेल्या पुराने कापसाचे अर्धेअधिक क्षेत्र क्षतिग्रस्त झाले आहे. यामुळे या ठिकाणच्या कापूस उत्पादनाला यावर्षी फटका बसण्याचा धोका आहे. यामुळे कापूस गाठी पुरविण्याचे सौदे घेणारे व्यापारी आतापासून कामाला लागले आहे.

या व्यापाऱ्यांनी कापूस उत्पादक शेतकऱ्यांना गाठण्यास सुरुवात केली आहे. खेडा खरेदी करणारे व्यापारी यासाठी आघाडीवर आहेत. त्यांनी कापूस उत्पादक शेतकऱ्यांचा पहिला वेचा मिळावा म्हणून ॲडव्हान्स बुकिंग केले आहे. १० ते ११ हजार रुपये क्विंटल दराने टाेकन शेतकऱ्यांना दिले जात आहे. यामुळे येणाऱ्या हंगामात कापूस मिळविण्याचा मार्ग व्यापाऱ्यांनी मोकळा केला आहे.

खेडा खरेदीच्या माध्यमातून व्यापारी असे बुकिंग करतात. मोठ्या व्यापाऱ्यांनी असे बुकिंग केले नाही. यावर्षी उत्पादन नसल्याने कापसाचे दर तेज राहण्याची शक्यता जास्त आहे.

- शुभम जैन, व्यापारी

शासकीय कापूस खरेदीसाठीचा प्रस्ताव राज्य शासनाकडे दिला जाणार आहे. शासकीय दराने प्रत्येक जिल्ह्यात किमान एक केंद्र मिळावे असा प्रस्ताव राहणार आहे. मात्र, कापसाचे शासकीय दर खुल्या बाजारापेक्षा कमी आहेत.

- राजाभाऊ देशमुख, अध्यक्ष कापूस पणन महासंघ

हरियाणामध्ये कापूस खरेदीचा शुभारंभ झाला. त्या ठिकाणी क्विंटलला १० हजार रुपये भाव मिळाला आहे. बाजार समितीकडे कापूस आलेला नाही.

- सुधीर काेठारी, सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती, हिंगणघाट

टॅग्स :agricultureशेतीcottonकापूसFarmerशेतकरीYavatmalयवतमाळ